Home चंद्रपूर लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे 55 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह...

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे 55 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

0
176

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड घुग्घुस येथे 55 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, घुग्घुस येथे 55 वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह मोठ्या उत्साहात आणि जागरूकतेने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने 04 मार्च 2026 रोजी सकाळी 09:00 वाजता सुरक्षा शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन युनिट हेड श्री. वाय.जी.एस.प्रसाद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा नियमांचे पालन करून सुरक्षित कार्यसंस्कृती अंगीकारण्यास प्रवृत्त केले.

सुरक्षा सप्ताहादरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षेबाबत जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 05 मार्च 2026 रोजी असेंबली पॉईंट येथे अग्निशमन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये अग्निशमन पर्यवेक्षक श्री. बबलू बिंग यांनी कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षेशी संबंधित महत्वाची माहिती दिली.

06 मार्च रोजी सेफ्टी रेस स्पर्धा आणि 07 मार्च रोजी सेफ्टी (Quiz) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता. 09 मार्च 2026 रोजी 600 TPD परिसरात स्लिप, ट्रीप आणि फॉल आणि फायर फायटिंगवर मॉक ड्रिल घेण्यात आले, ज्याला कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

यासोबतच सुरक्षा घोषवाक्य आणि पोस्टर स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये प्रथम, द्वितीय,तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी निवडलेल्या स्पर्धकांची निवड करण्यात आली होती.

10 मार्च 2026 रोजी दुपारी 04:00 वाजता बक्षीस वितरण समारंभाने सुरक्षा सप्ताहाची सांगता झाली. कार्यक्रमाची सुरुवात सुरक्षा प्रतिज्ञाने झाली, यामध्ये सुरक्षा अधिकारी श्री.विपिन एम.रायकवार यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेची शपथ दिली. यावेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी ‘सुरक्षा नसेल तर नरक निश्चित’ या विषयावरील स्किटही सादर करून प्रत्येकाला सुरक्षिततेबाबत जागरूक राहण्याचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!