Home गडचिरोली भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसी करिता अधिग्रहित करू नये ; शेतकरी बचाव...

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसी करिता अधिग्रहित करू नये ; शेतकरी बचाव जन आंदोलन संघटनेची मागणी

0
172

भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमीन एमआयडीसी करिता अधिग्रहित करू नये ; शेतकरी बचाव जन आंदोलन संघटनेची मागणी

जिल्हाधिकारी कार्यालया समोर हजारो शेतकऱ्यांचे धरणे व मुंडन आंदोलन करीत जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

 

गडचिरोली, सुखसागर झाडे
चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित जेएसडब्ल्यू प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया शासनाकडून सुरू करण्यात आली आहे. या प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला स्थानिक शेतकरी व नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

या पार्श्वभूमीवर भेंडाळा परिसरातील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करू नयेत या प्रमुख मागणीसाठी शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या वतीने १२ मार्च २०२६ रोजी गडचिरोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त करण्यासाठी मुंडन करून शासनाच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदविला.

यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच ह.भ.प. मुरलीधर महाराज हरणघाट यांनी स्वतः मुंडन करून आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या लढ्याला पाठिंबा दर्शविला.

दरम्यान, शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. भेंडाळा परिसरातील सुपीक शेतीजमीन अधिग्रहित केल्यास हजारो शेतकरी कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात येईल, त्यामुळे हा निर्णय तातडीने रद्द करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे म्हणाले की, भेंडाळा परिसरातील जमीन अत्यंत सुपीक असून येथील शेतकरी शेतीवरच आपला उदरनिर्वाह करतात. उद्योगाच्या नावाखाली शेतकऱ्यांची सुपीक जमीन हिरावून घेणे अन्यायकारक आहे.
शासनाने हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही तर शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावरून ते विधिमंडळापर्यंत तीव्र आंदोलन उभारण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या जमिनींचे जबरदस्तीने अधिग्रहण करण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही आणि काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाकडून जिल्हाध्यक्ष वासुदेव शेडमाके आणि राजेंद्र लांजेकर यांनी आपले समर्थन दिले आणि भविष्यातील शेतकऱ्यांच्या लढ्यात आपला सहभाग असल्याची भूमिका मांडली. भारतीय जनता पक्षाकडून जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे,माजी आमदार नामदेव उसेंडी, प्रशांत वाघरे उपस्थित होते आणि पक्ष म्हणून आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू आणि सरकारकडे MIDC दुसऱ्या ठिकाणी हलवावी यासाठी पाठपुरावा करू आणि आपण एक शेतकरी म्हणून कायम शेतकऱ्यांसोबत असल्याची भूमिका मांडली.वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रशांत देवारे आणि हितेश मडावी यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील लढ्यात आपण आणि आपला पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत राहू अशी भूमिका मांडली. राष्ट्रवादी (शरद पवार )पक्षाकडून अमोल भाऊ गण्यारप्पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि अधिसूचना रद्द होईपर्यंत आपला लढा सुरु ठेवावा लागेल हि भूमिका मांडली.
आंदोलनाची दखल घेऊन मा.जिल्हाधिकारी साहेब यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी आमंत्रित केले. शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी बचाव जणआंदोलन समितीच्या सदस्यांनी आणि महेंद्र भाऊ ब्राम्हणवाडे यांनी चर्चा केली. या चर्चेत जिल्हाधिकारी यांनी प्रक्रिया सुरवातीच्या टप्यात असून शेतकऱ्यांनी गैरसमज करून न घेता प्रक्रिया समजून घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे.
हि भूमिका घेऊन अंतिम जमीन संपादन करताना शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमीन अधिग्रहित केली जाणार नाही अशी माहिती दिली. यावर चर्चेसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने कोणसरी परिसराचा दाखला देत आम्हाला या सर्व प्रक्रियेमधून जायचं नसल्याची भूमिका घेतली.आणि परिसरातील सर्व शेतकऱ्यांना MIDC नको हिच भूमिका लावून धरली. यावर सर्व मागण्या एकूण घेत सरकारपर्यंत हि माहिती पोहोचवणार असल्याची माहिती दिली.मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच काही प्रमाणात समाधान झाले असले तरी जो पर्यंत 13 जानेवारी 2026 ची शासन राजपत्रातील अधिसूचना रद्द होणार नाही तो पर्यंत शेतकरी शांत बसणार नाही.
यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत कोवासे, नगरसेवक सतीश विधाते, नगरसेवक रमेश चौधरी, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, अनिल कोठारे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, रजनीकांत मोटघरे, माजी जि.प. सदस्य कविता भगत, विजय लाड, प्रतीक बारसिंगे, उत्तम ठाकरे, श्रीनिवास ताडपलीवार, संजय गावडे, संजय चन्ने, हरबाजी मोरे, नदीम नाथानी, दिवाकर निसार, धीवरू मेश्राम, हेमंत मोहितकर, स्वप्निल बेहेरे, प्रेमानंद गोंगले, राहुल वैरागडे, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकार, जावेद खान, सौ. कल्पना नंदेश्वर, सौ. कविता उराडे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. रिता गोवर्धन, सौ. मंजू आत्राम, सौ. मीनल चिमूरकर, वन्ता हलामी आदी काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.

तसेच शेतकरी बचाव जनआंदोलन समिती, भेंडाळाचे अध्यक्ष मनोज पोरटे यांच्यासह भुवनेश्वर चौधरी, सुधीर शिवणकर, सतीश फुटकंवार, दिगंबर धानोरकर, सुखसागर झाडे, परशुराम किरणे, विठ्ठल पाल, रवी धोटे, संजय खेडेकर, प्रीतम देशमुख, देवानंद दुर्गे, रविंद्र वाडगुरे, विजय झाडे, राजकुमार घोगरे, लचमा शिरगांवार, अनंत चौधरी, रूपचंद जीवनकर, गुरुदास चौधरी, सदानंद जवादे, विवेक भगत, तोताजी आभारे, सचिन सातपुते, आनंदराव सातपुते, अभिजीत सातपुते, रविंद्र चुनारकर, चरण पोरटे, विकास रायसिडाम, नामदेव किनेकर, देवानंद तुमडे, दादाजी कुथे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व हजारो शेतकरी बांधव आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!