Home चंद्रपूर घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आनंद मेळावा

घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आनंद मेळावा

0
55

घुग्घुस शहरात जागतिक महिला दिनानिमित्त आनंद मेळावा

घुग्घुस दि.९ मार्च २०२६ सोमवार रोजी तहसील कार्यालय परिसरातील समोरील विश्वरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा जवळ आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा तसेच आनंद मेळावा मोठ्या संख्येने महिल्यांनी कार्यक्रम घेण्यात आले.

सर्वप्रथम राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर,रमाबाई आंबेडकर आणि बरेच थोर विचारवंत महिल्यांचा प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष अंगणवाडी (सुपरवायझर) कल्पना नगराळे तसेच जनता काॅनव्हेट शाळेचे प्राचार्य सौ.सविता विनय बोढे यांच्या मार्गदर्शनात प्रमुख पाहुणे सौ.मिना राजेश मोरपाका, वैशालीताई डवस, नितु चौधरी,सारीका ईसारप, किरण बोढे, पुष्पा रामटेके मंचावर उपस्थित होते.

अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या स्वागत, सत्कार करण्यात आले.तसेच संगीत,डान्सच्या महिला कार्यक्रम आयोजित करण्यात आले. डान्स नियोजन सौ.कोमल रामटेके,सुरेखा बहादुरे यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन व संकल्पना करणारे सौ.पुजा दुर्गम, सुचिता लुटे, सुनिता घिवे,सुनिता पाटील यांच्या नियोजनाने कार्यक्रम पार पडला.
त्यांचे धैय मनोगत व्यक्त करीत म्हणाले की,जागतिक महिला दिन हा केवळ सन्मान करण्याचा नाही, तर महिलांच्या रोजगार संधी आणि समान हक्कांसाठी कृतिशील राहण्याचा दिवस आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक, सामाजिक तसेच मोठ्या उत्साहात महिला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!