Home चंद्रपूर आ.जोरगेवार जनसंपर्क कर्तव्य केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमत्त विनम्र अभिवादन

आ.जोरगेवार जनसंपर्क कर्तव्य केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमत्त विनम्र अभिवादन

0
187

आ.जोरगेवार जनसंपर्क कर्तव्य केंद्रात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमत्त विनम्र अभिवादन

घुग्घुस येथील आ. किशोरभाऊ जोरगेवार यांच्या जनसंपर्क कर्तव्य केंद्रात दि.१० मार्च २०२६ मंगळवार रोजी नारीशक्तीचे प्रतिक, भारतातील स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करित विनम्र अभिवादन करण्यात आले.

आ.किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनातून भारतीय जनता पार्टीचे गटनेता व नगरसेविका सौ. मिना राजेश मोरपाका यांनी आपले मनोगत व्यक्त करीत म्हणाले की,शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांनी शिक्षणातून जनसामान्यांच्या उध्दाराचा मार्ग दिला.तसेच महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे कार्य केले.त्यांचे चरित्र, कार्य आणि विचार सदैव प्रेरणादायी राहतील.

याप्रसंगी भाजपा घुग्घुस शहराध्यक्ष श्री.संजय तिवारी, गटनेता व नगर सेविका सौ. मीनाताई राजेश मोरपाका, नगरसेविका मधुताई तिवारी,माजी.सरपंच संतोष नुने,माजी ग्रा.पं.सदस्य गणेश उईके,राजेश गिरडकर,आशिष गौरकर,प्रेम गंगाधरे, अनिल कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!