Home गडचिरोली येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित

येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित

0
81

येनापूर ते जयरामपूर मार्गावरील वाहतूक तात्पुरती प्रतिबंधित

चामोर्शी, सुखसागर झाडे :– तालुक्यातील कोनसरी येथील सुरु असलेल्या लॉयल्ड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनी चा लोहप्रकल्प करिता भुसंपादन प्रकिया 11 मार्च पासून राबविताना अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस स्टेशन आष्टी हद्दी अंतर्गत येत असणाऱ्या मुधोली चक नं. 2, पारडी देव रिठ, व जयरामपूर येथे भुसंपादन प्रकिया पूर्ण करण्यात येत आहे.
सदर भूसंपादन प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होवून आंदोलने, निदर्शने, विरोध्द प्रदर्शनें, ताणतणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून येणापूर तें जयरामपूर मार्गांवरील वाहतूक दिनांक 10 मार्च तें 14 मार्च 2026 पर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी अविश्यात पंडा यांनी जारी केला.
यानुसार येणापूर तें जयरामपूर या मार्गावरील दोन्ही बाजूनी सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद राहील. मात्र प्रवासी बसेस तसेच पाणी पुरवठा,महावितरण, दुरसंचार व रस्ता दुरुस्ती संदर्भातील अत्यावश्यक सेवा वाहनांना या आदेशात वगळण्यात आले आहे.
सदर आदेश मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 व 116 अन्वये जारी करण्यात आला असून आदेशाचे उलंघन करणाऱ्या विरोद्धात भारतीय दंड संहिता 1860 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक पोलीसांना देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!