Home गडचिरोली भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनास वंचित बहुजन...

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

0
124

भेंडाळा परिसरातील शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा

चामोर्शी l सुखसागर झाडे : तालुक्यातील भेंडाळा परिसरात सुरू असलेल्या शेतकरी बचाव जनआंदोलन समिवतीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रक्रियेविरोधात या समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या लढ्याला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रिय सहकार्य करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
भेंडाळा परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या जमिनींचे अधिग्रहण यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय जमिनी घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून, शासनाने तात्काळ हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शेतकरी बचाव जनआंदोलन समितीच्या धरणे व मुंडण आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवून शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, असा इशाराही आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे पूर्व विदर्भ संयोजक प्रा.हितेश मडावी, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.प्रशांत देव्हारे, वंचित बहुजन आघाडी जिल्हाकार्यकरिणी सदस्य देवानंद जी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र जी जुवारे, भेंडाळा येथील सरपंचा कुंदा जुवारे मॅडम , शेतकरी बचाव जनआंदोलन समितीचे अध्यक्ष मनोज पोरटे व परिसरातील शेतकरी, प्रतिनिधी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!