Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) – मैदानी चाचणी यशस्वीपणे...

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) – मैदानी चाचणी यशस्वीपणे संपन्न

0
66

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 (प्रत्यक्ष भरती 2026) – मैदानी चाचणी यशस्वीपणे संपन्न

गडचिरोली, सुखसागर झाडे,जिल्हा पोलीस दलामार्फत 717 पोलीस शिपाई व 27 चालक पोलीस शिपाई पदांसाठी घेण्यात आलेली मैदानी चाचणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पारदर्शक व सुरळीत वातावरणात पार पडली.

एकूण 20,797 उमेदवारांनी दिली प्रत्यक्ष मैदानी चाचणी
551 पोलीस अधिकारी व अंमलदारांचा बंदोबस्त
PST Digital Technology द्वारे शारीरिक मोजमाप
RFID तंत्रज्ञानाद्वारे धाव चाचण्या
Prism Technology द्वारे गोळाफेक चाचणी
मैदानावर तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध

चालक पोलीस शिपाई पदासाठी वाहन कौशल्य चाचणी एमआयडीसी मैदानावर RTO यांच्या समक्ष सुरू असून 10 मार्च 2026 पर्यंत 575 उमेदवारांची चाचणी होणार आहे.

मैदानी चाचणीचे गुण तत्काळ अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आले असून लेखी परीक्षेस पात्र उमेदवारांची यादी व परीक्षेचा दिनांक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

या यशस्वी आयोजना दरम्यान शहीद पांडू आलाम सभागृह येथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी स्नेहभोजन (बडाखाना) आयोजित करण्यात आले.

पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान पारदर्शकता • तंत्रज्ञान • शिस्तबद्धता
गडचिरोली पोलीस दलामार्फत यशस्वीरित्या राबविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!