रजत वाळके यूपीएससी उत्तीर्ण, गगनझेप घेत वडिलांचे स्वप्नं केले साकार
आपचे ज्येष्ठ नेते बाळकृष्ण सावसाकडे यांनी केला गौरव
गडचिरोली, सुखसागर झाडे : जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात राहणारे रजत वाळके यांनी नुकत्याच यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आले देशातील कठीण परीक्षेमध्ये 514 वि रँक उत्तीर्ण करून त्यांचा पुष्पगुच्छ व I R S अधिकारी भरत आंधळे यांचे “गरुडझेप एक ध्येयवेडा प्रवास ” हे पुस्तक देवून निवासस्थानी गौरविण्यात आले त्यांनी J EE परीक्षा उत्तीर्ण करून VNIT नागपूर येथे कम्प्युटर सायन्स अभियांत्रिकी पदवी प्राप्त करून आई वडिलांचे नाव लौकिक करून जिल्ह्याचा सन्मान राखला इतर स्पर्धकांनी जिद्द , परिश्रम, व सातत्य ठेवून संघर्ष करावे तरच यशाला गवसनी घालता येतो पुढील देशसेवा करण्याचे वाटचलीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात रजत वर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. फुलं नाही तर फुलांची पाकळी या युक्ती प्रमाणे आपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते बाळकृष्ण सावसागडे यांनी रजत वाळके चे मनस्वी कौतुक करीत पुष्पगुछ व पुस्तकं भेट देत त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी भास्कर इंगळे, प्रेम धोबे,विजय भेंडारे,सदाशिव पेंदाम, संजय वाळके,आदी उपस्थित होते.









