Home गडचिरोली देवा भाऊच्या “लाडक्या बहिणीवर” आली आमरण उपोषणाची वेळ

देवा भाऊच्या “लाडक्या बहिणीवर” आली आमरण उपोषणाची वेळ

0
82

देवा भाऊच्या “लाडक्या बहिणीवर” आली आमरण उपोषणाची वेळ

सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या फसवणूकीमुळे लाडक्या बहिणीं’वर उपोषणाची वेळ – महेंद्र ब्राह्मणवाडे

 

गडचिरोली, सुखसागर झाडे :- मेक इन गडचिरोली च्या माध्यमातून चामोर्शी येथे अगरबत्ती प्रकल्प सुरू करून रोजगार देण्याचे आमिष दाखवत भाजपच्या एका नगरसेवकाने महिलांची फसवणूक केल्याचा आरोप करत काही महिला गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे उपोषणास बसल्या आहेत. या उपोषणकर्त्या महिलांच्या मंडपाला गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी भेट देऊन महिलांशी संवाद साधला.

सदर प्रकरणात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) मधील नगरसेवकाचा थेट नामोल्लेख असल्याने तसेच सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासनाने या उपोषणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे काही महिलांची प्रकृती खालावून त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाही ‘देवा भाऊंच्या लाडक्या बहिणीं’वर त्यांच्या पक्षातीलच एका नगरसेवकामुळे उपोषण करण्याची वेळ येणे ही गंभीर बाब असल्याचे महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी सांगितले. मात्र, या संपूर्ण प्रकरणाकडे मुख्यमंत्री तसेच प्रशासनाने अद्यापही दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

सदर प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित उपोषणकर्त्या महिलांवर झालेला अन्याय तत्काळ दूर करावा, अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी यावेळी केली.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल कोठारे, विपुल येलटीवार, नंदू कुमरे, पवन गेडाम यांचे सह आंदोलन कर्ते मीनाक्षी पिपरे, देवांगना गौतम, निवृत्ता गवारे, शीला धोडरे, कविता कारडे, सुषमा धोडरे, रेखा गवारे, छाया बोदलकर, वेणू धोडरे, अनिता पिपरे, मनीषा गवारे, सुषमा बुरांडे, अर्चना बुरांडे, शारदा पीपरे, साधना धोडरे, जयश्री पिपरी, वंदना कोठारे, अर्चना धोडरे, अश्विनी गव्हारे, चंद्रशेखर मस्के, आमदास झरकर, नितेश पिपरे, शालिनी पीपरे, मिलिंद भांडेकर यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!