Home चंद्रपूर एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालय, मारोडा चे अकरा विद्यार्थी यशस्वी

एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालय, मारोडा चे अकरा विद्यार्थी यशस्वी

0
247

एनएमएमएस परीक्षेत विश्वशांती विद्यालय, मारोडा चे अकरा विद्यार्थी यशस्वी

मूल :- तालुक्यातील मारोडा येथील विश्वशांती विद्यालय, मारोडा या विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी घेतल्या जाणाऱ्या National Means-cum-Merit Scholarship Scheme (एनएमएमएस) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील 24 पैकी तब्बल 11 विद्यार्थी या प्रतिष्ठित परीक्षेत उत्तीर्ण झाले असून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
एनएमएमएस ही परीक्षा इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. या परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते. विश्वशांती विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम, नियमित सराव व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळवले.विद्यालयाचे मुख्याध्यापकश्री धनंजय गाडेवार सर तसेच स्थानिक शाळा समिती चे अध्यक्ष बल्लमवार सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली असून मारोडा परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!