बत्तीस वर्षांनंतर जुळून आले मैत्रीचे रेशीमबंध
जनता विद्यालय शाळेच्या १९९४-९५ बॅचचे स्नेहसंमेलन
घुग्घुस येथील स्नेहसंमेलन १९ फेब्रुवारी २०२६ कार्यक्रमाची सुरुवात जनता विद्यालयाचे गुरुवर्य सन्माननीय सुधाकरजी अडबाले विधान परिषद आमदार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.तसेच सोबत सन्माननीय अशोक बेलेकर, मुख्याध्यापक जनता विद्यालय, सन्माननीय डॉ. विजय हेलवटे,विनायक आसुटकर, दिलीप मोरे, दिलीप कापसे,अरुण गंधारे, मोहन गंधारे,पांडुरंग पिंपळकर,मारुती कूसपुरे,संजय पठाण,चंद्रशेखर बोबडे,श्री. के .वाय.कुटेमाटे,छाया बत्तूलवार,अनया पामपतुलवार,या सर्वांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.दीप प्रज्वलन झाल्यानंतर राष्ट्रगीत श्री.निलेश कापसे यांनी सामूहिक पद्धतीने घेण्यात आले.तसेच आपल्यातील दिवंगत गुरुजन व मित्र यांना आदरांजली देण्यात आले.व स्वागत गीत पुष्पा उरकुडे व त्यांचा संच यांनी सादर केला. लगेच शिवगर्जना पांडुरंग नांदे यांनी घेतले. गुरुवर्य उपस्थिती मान्यवरांचे मार्गदर्शन व संभाषण झाले. तसेच काही विद्यार्थीमनोगत व्यक्त करण्यात आले. श्री.पांडुरंग नांदे यांनी आपले विद्यार्थी मनोगत व्यक्त केले. या स्नेहसंमेलनात जनता विद्यालय घुग्घूस १९९४-९५ शिक्षण घेतलेल्या विद्यार्थी महाराष्ट्रात तसेच विविध राज्यात नोकरी व व्यवसाय करत असताना आपल्या वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित दर्शवली हेच विशेष आकर्षण ठरले. झारखंड तेलंगाना ,उत्तर प्रदेश व इतर परराज्यातून आपल्या स्नेहसंमेलनाकरिता आलेले विद्यार्थी उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी या कार्यक्रम तयार करण्यासाठी लागले विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांना या सर्वांना संपर्क करणे कार्यक्रमाचे नियोजन करणे यात प्रामुख्याने सॅमसोन रामटेके, विजय बावणे, कमलाकर चहारे, राजू परागे,श्याम कुमरवार, संदीप काकडे, देवानंद रामटेके प्रवीण देसाई, दीपा गादम,पुष्पा उरकुडे,अर्चना तिवारी,उज्वला दुर्गे,एकता भोगेवार,तसेच इतर सर्वांच्या सहकार्याने व परिश्रमाने या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता मेहनत घेतली. सर्व विद्यार्थ्यांना बालपनी आठवणीचे भेट सुद्धा देण्यात आले. सकाळी अल्पाहार व दुपारी भोजनाची व्यवस्था करण्यात आले,स्नेहसंमेलनाचे आभार श्याम कुमरवार यांनी मानले.








