जय भवानी! जय शिवाजी! च्या गजराने दुमदुमली घुग्घुस नगरी
छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा
घुग्घुस येथील युवा बजरंग क्रिडा मंडळ व शिवजयंती उत्सव समितीने गांधी चौक येथे दि.१९ फेब्रुवारी २०२६ गुरूवार सांयकाळ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम महाराष्ट्र आराध्य दैवत आणि ‘हिंदवी स्वराज्याचे’ संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाला आणि विचारांना त्यांच्या मूर्तीला द्विपजवलीत करून पुष्पहार अर्पण करून त्रिवार अभिवादन करण्यात आले.
सांस्कृतिक,व्याखान,नृत्य-संगीत अशाप्रकारचे विविध कार्यक्रम घेण्यात आले.तर मोठ्या उत्साहात व जल्लोषात असून जय भवानी,जय शिवाजीच्या गजराने घुग्घुस नगरी वातावरण शिवमय झाले.तसेच ॲड. दिपक चटप यांच्या व्याखानाता नागरिक शिवभक्ति मनमोहन झाले.
वरीष्ठ मान्यवरांनी म्हणटले की,शिवजयंती उत्सव सर्वप्रथम महात्मा ज्योतिबा फुले यांनी १८७० मध्ये पुण्यात सुरू केला त्यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि तिथे शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली.
शिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.
याप्रसंगी सतीश बोंडे, गणेश पिंपळकर,निलेश पिंपळकर, राजेश मोरपाका,दिलीप खांडेकर,शुभम जेऊरकर,गौरव ठाकरे,चंद्रशेखर आभारे,राहुल ठाकरे,राजू काळे,महिपाल कांबळे,गजानन जोगी,विनोद सातघरे,सागर डोहे, चेतन धांडे, प्रवीण ठाकरे,मनोज खोबरे,विपुल खारकर,आशिष गणफाडे, निखिल पर्वतकर,वेदांत पायघन,चेतन जेउरकर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.








