Home गडचिरोली स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची आंतरविद्यापीठ वुडबॉल...

स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची आंतरविद्यापीठ वुडबॉल बॅडमिंटन स्पर्धेत निवड

0
238

स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांची आंतरविद्यापीठ वुडबॉल बॅडमिंटन स्पर्धेत निवड

चामोर्शी, सुखसागर झाडे :- सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, चामोर्शी द्वारा संचालित स्व. जागेश्वर सावकार गण्यारपवार कला व विज्ञान महा. घोट येथील विद्यार्थ्यांची क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर घातली आहे.
या चालू वर्षीय सत्रात महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची ऑल इंडिया आंतरविद्यापीठ वूड बॉल स्पर्धेसाठी निवड झाली. मध्यप्रदेश राज्यातील
मध्यचल प्रोफेशनल विद्यापीठ, भोपाळ येथे होणाऱ्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी वूडबॉल स्पर्धेसाठी गोंडवाना विद्यापीठाच्या संघात महाविद्यालयाचे कु. हेमलता गौरंग बिश्वास,कु. पल्लवी पवन बिश्वास, अभय प्रभाकर पोटावी यांची दिनांक २३ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळचे संस्थापक/अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार, संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य गण्यारपवार, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रवीण मडावी, प्रा. मंडल सर, वाढई सर, भोलाराम मेश्राम, तथा सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी निवड झालेल्या विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!