Home गडचिरोली सर्पदंशाने चिमुकली चा गेला जीव

सर्पदंशाने चिमुकली चा गेला जीव

0
145

सर्पदंशाने चिमुकली चा गेला जीव

प्राथमिक उपचार न मिळाल्याने निष्पाप चिमुकलीला गमवावा लागला जीव

 

चामोर्शी, सुखसागर झाडे :- तालुक्यातील आमगाव महाल येथील नायरा तानाजी कुकुडकर वय 5 वर्ष ही आपल्या घरासमोर अंगणात चेंडू खेळत होती. खेळता खेळता चेंडू हा अंगणात कडेला रचून असलेल्या काड्याच्या ढिगारात गेला असता ती चेंडू घेत असताना दडी मारून असलेल्या विषारी सापाने तिच्या हातांच्या बोटाला दंश केला.
सापाने दंश करताच मुलगी रडत गयावया करताना घरची मंडळी व आजूबाजूला असणाऱ्या लोकांनी धाव घेत सदर स्थळाची पाहणी केली असता काड्या मध्ये साप दिसला. सदर सापाला सर्पमित्राच्या साहाय्याने पकडण्यात आले.
परंतु तोपर्यंत नायराच्या अंगात विष पसरल्याने ती बेशुद्ध अवस्थेत तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर कोणताही प्राथमिक उपचार न करता तिला ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे रेफर देण्यात आली.
सदर प्रकरणात भांबवलेल्या आई वडिलाने व आप्त परिवारानी तिला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय चामोर्शी येथे दाखल केले. उपचारा दरम्यान तिची प्राण ज्योत मावळली.
सदर धावाधाव मध्ये बराच उशीर झाल्याने व तिच्यावर ताबडतोब प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचार न मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या मुलीला गमावावे लागले असा टाहो फोडीत नायरा च्या आई-वडील व आप्त परिवाराने आपबीती स्पष्ट केली.
आरोग्य विभागा कडून असंवेदनशील आरोग्य सेवा मिळत असल्याने जीव गमवावा लागला. यामुळे गोर गरीब सर्व सामान्य रुग्णांनी आरोग्य सेवा घ्यायचं कुठे? असा संतप्त सवाल कुटुंबीय व नागरिक यांच्याकडून आरोग्य विभागावर उपस्थित करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!