Home चंद्रपूर आमदार भोंगळे यांच्या हस्ते रस्त्याच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…

आमदार भोंगळे यांच्या हस्ते रस्त्याच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…

0
117

आमदार भोंगळे यांच्या हस्ते रस्त्याच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न…

ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांसाठी दळणवळणाच्या सोयी अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने पिंपळगाव येथे (दि.५) नांदा-पिंपळगाव, गडचांदूर-उपरवाही, मंगी- भुरकुंडा या रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन केले.

रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे.चांगल्या सुसज्ज रस्त्यांवरून देशाच्या विकासाची व्याख्या ठरविली जाते. या रस्त्यांचे भूमिपूजन केल्याने या भागातील तयार होणाऱ्या सुसज्ज रस्त्यांवरून नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही प्राथमिकता असून ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हेच आपले ध्येय असल्याचे मत व्यक्त आमदार यांनी व्यक्त केले.

यावेळी गटविकास अधिकारी श्रीकांत बोबडे, माजी पंचायत समिती सभापती संजय मुसळे, गटशिक्षणाधिकारी कल्याण जोगदंड , विस्तार अधिकारी लोकेश खंडाळे, सरपंच दीपक मडावी, उपसरपंच आबाजी बोबडे, तालुका महामंत्री सतीश उपलेंचवार, महामंत्री पुरुषोत्तम भोंगळे, धम्मकीर्ती कापसे, रवी बंडीवार, संजय नीत, खुशाल गोहोकर , बाळकृष्ण गेडाम ,भास्कर जोगी, विकास लोहे, मारोती नागपुरे, दशरथ गोहोकर, बंडू बोढाले, प्रशांत नागपुरे, वामन गानफाडे, भिवसन लोणबले, आनंदराव गोहणे, मधुकर लोढे, प्रभाकर जोगी,ज्योती खंडाळे,प्रमोद खडसे, यांचेसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!