Home चंद्रपूर घुग्घुस बायपास रस्ता बांधकामातील अनियमितता उघड, भ्रष्टाचाराचा संशय!

घुग्घुस बायपास रस्ता बांधकामातील अनियमितता उघड, भ्रष्टाचाराचा संशय!

0
162

घुग्घुस बायपास रस्ता बांधकामातील अनियमितता उघड, भ्रष्टाचाराचा संशय!

घुग्घुस शहरातील मुख्य मार्गावरील बायपास रस्त्याच्या बांधकामात गंभीर अनियमितता समोर आली आहे. या मार्गावरून दिवसरात्र जड वाहनांची वाहतूक सुरू असून, मात्र नुकत्याच झालेल्या पाहणीत बांधकामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे.
बायपास रस्त्याच्या कडेला मुरुम व कांक्रीटचा भराव अपेक्षित असताना, त्या ठिकाणी पावर प्लांटचा फ्लाय ऐश टाकण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे जड वाहने रस्त्याच्या कडेला उभी केल्यास त्यांचे टायर एक ते दोन फूट जमिनीत धसत आहेत. काही वाहने रस्त्याच्या बाजूला अडकत असून वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवनिर्मित बायपास रस्त्याची अशी अवस्था म्हणजे बांधकामातील निष्काळजीपणा व भ्रष्टाचाराची कलाई उघड करणारी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वेळेत दखल न घेतल्यास भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बायपास रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून योग्य व दर्जेदार भराव करून रस्ता सुरक्षित व मजबूत करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!