गडचांदूर शहरातील प्रदूषणाविरोधात एकवटले नागरिक
गडचांदूर प्रदूषण त्रस्त समिती ची स्थापना
गडचांदूर शहरातील संबंधित कंपनीच्या डम्पिंग यार्डमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व वायू प्रदूषण होत असून याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. लहान मुले, वृद्ध, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांना श्वसनाचे विकार, डोकेदुखी, मळमळ व इतर आजारांना सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी पवन लक्ष्मण देरकर यांच्या पुढाकाराने गडचांदूर येथे नागरिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस एकूण १६ जागरूक नागरिक उपस्थित होते. बैठकीदरम्यान प्रदूषणाच्या दुष्परिणामांवर सखोल चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित सर्वांनी एकमताने शपथ घेतली की “जोपर्यंत गडचांदूर शहर प्रदूषणमुक्त होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.” या निर्धारातूनच “गडचांदूर प्रदूषण त्रस्त समिती” ची स्थापना करण्यात आली असून, शहरातील प्रदूषणाविरोधात लोकशाही मार्गाने, कायदेशीर व शांततामय लढा सुरू करण्यात आला आहे.
ही समस्या कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून संपूर्ण गडचांदूर शहराच्या आरोग्याची आहे. त्यामुळे गावातील सर्व स्तरातील नागरिकांनी, सामाजिक संस्था, डॉक्टर, वकील, व्यापारी, युवक व महिलांनी पक्षभेद विसरून या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.या बैठकीस उपस्थित मान्यवर:पवन लक्ष्मण देरकर
सुरेश कांबळे, धनंजय छाचड, हंसराजजी चौधरी, नागेश चटप
डॉ. मोरे साहेब, डॉ. पंकज देरकरगोकरे साहेब. अनिल सूर्यतड विवेक जी एरणे गुंडावार जी आशिकी आशु रोकडे चिवाने जी
गडचांदूर शहराचे आरोग्य व स्वच्छ पर्यावरण राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा नागरिकांच्या आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशाराही गडचांदूर प्रदूषण त्रस्त समिती कडून यावेळी देण्यात आला.








