Home चंद्रपूर लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे प्रजासत्ताक दिनी थाटात उद्घाटन

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे प्रजासत्ताक दिनी थाटात उद्घाटन

0
152

लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनच्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे प्रजासत्ताक दिनी थाटात उद्घाटन
आधुनिक शेती, शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांच्या सबलीकरणाचा नवा अध्याय
मुरसा : लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा यांचे उद्घाटन देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २६ जानेवारी रोजी अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पडले. या केंद्राचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक मा. श्री. मधुर गुप्ता यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
या उद्घाटन समारंभाला टॉगल हेडचे संचालक व सहसंस्थापक मा. श्री. क्रिश रामनानी, जी. डी. गोएंका अकॅडेमीच्या वरिष्ठ संचालक श्रीमती भारती शर्मा चंद्रपूर जिल्हा कृषी अधीक्षक श्री. शंकर तोटावर, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे युनिट हेड श्री. वाय. जी. एस. प्रसाद, तसेच कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी शेतकऱ्यांसाठी विशेष तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे व कृषी बुलेटिनचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेले हे शेतकरी प्रशिक्षण केंद्र परिसरातील शेतकऱ्यांसाठी एक प्रभावी मार्गदर्शन केंद्र ठरणार आहे. या केंद्रामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, माती परीक्षण, जमिनीची सुपीकता टिकविण्याच्या उपाययोजना यांचे शास्त्रीय प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, शाश्वत शेती पद्धती, पाणी व्यवस्थापन, खतांचा संतुलित वापर आणि कीड-रोग नियंत्रण याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे शेतीवरील खर्च कमी होऊन उत्पादन वाढीस निश्चितच मदत होईल, असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकात श्री. प्रशांत पुरी यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. मधुर गुप्ता यांनी सांगितले की, या प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास वृद्धिंगत होणार असून त्यांचे आर्थिक सबलीकरण होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि ग्रामीण विकासासाठी लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशन सातत्याने कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रमुख पाहुणे श्री. शंकर तोटावर यांनी जमिनीची सुपीकता वाढविणे व टिकवून ठेवणे याबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच शासनाच्या विविध कृषी योजना व त्यातून मिळणाऱ्या लाभ याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या उद्घाटन प्रसंगी ज्या शेतकऱ्याने प्रशिक्षण केंद्रा मार्फत देण्यात येणाऱ्या विविध बाबी चा योग्य वापर केला त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये शेणगाव येथील श्री. गुलाराम धांडे, पांढरकवडा येथील श्री. सचिन काकडे, धानोरा येथील श्री. प्रवीण आमले, म्हातारदेवी येथील सौ. ज्योती वैरागडे व मुरसा येथील श्री. शांताराम ठाकरे या शेतकऱ्यांचे तसेच उत्कृष्ट ORW म्हणून लता बावणे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
उद्घाटनप्रसंगी शेतकरी प्रशिक्षण केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. यामध्ये भाजीपाला व सुधारित पिकांचे डेमो प्लॉट, गांडूळ खत निर्मिती, दशपर्णी अर्क, जीवामृत, अझोला युनिट, मशरूम उत्पादन, हायड्रोपोनिक्स युनिट, स्वयंचलित पाणी व्यवस्थापन प्रणाली तसेच शेतीतील यांत्रिकीकरण यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. या उपक्रमांचा लाभ ३२० शेतकरी व शेतकरी महिलांनी घेतला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे सहायक महाप्रबंधक डॉ. विद्या पाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन शेतकरी प्रशिक्षण केंद्र, मुरसा येथील व्यवस्थापक डॉ. आदित्य कदम यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्यास विविध गावांतील ग्रामपदाधिकारी, शेतकरी, प्रशिक्षणार्थी, महिला बचत गटाचे सदस्य तसेच लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड व लॉयड्स इन्फिनाइट फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!