Home गडचिरोली राज्याचे मुख्य सचिव यांची ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाला भेट

राज्याचे मुख्य सचिव यांची ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाला भेट

0
189

राज्याचे मुख्य सचिव यांची ऐतिहासिक मार्कंडा देवस्थानाला भेट

चामोर्शी : सुखसागर झाडे
विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या मार्कंडा येथे राज्याचे मुख्य सचिव राजेश_अग्रवाल यांनी आज ऐतिहासिक मार्कंडा_मंदिरास भेट देऊन तेथे सुरू असलेला मंदिराचा जीर्णोद्धार तसेच विविध विकासकामांची पाहणी केली. मंदिराच्या ऐतिहासिक वारस्याला साजेशा पद्धतीने, दर्जेदार व कालबद्ध रीतीने ही कामे पूर्ण व्हावीत, अशा स्पष्ट सूचना त्यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या.

मुख्य सचिव राजेश_अग्रवाल यांनी मंदिराच्या परिसरातील घाट, वाहनतळ, उद्यान, स्वच्छतागृह तसेच अंतर्गत व बाह्य सौंदर्यीकरणाच्या कामांची पाहणी केली. या कामांसंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी विभागीय आयुक्त तथा प्रधान सचिव विजयालक्ष्मी_बिदरी, पुरातत्त्व विभागाच्या महासंचालक नंदिनी साहू, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल, पुरातत्त्व अधिक्षण अरूण मलिक, तसेच सहायक जिल्हाधिकारी एम.अरूण प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!