Home गडचिरोली 33 वे झाडीबोली साहित्य संमेलन काटली येथे मोठया उत्साहात संपन्न

33 वे झाडीबोली साहित्य संमेलन काटली येथे मोठया उत्साहात संपन्न

0
89

33 वे झाडीबोली साहित्य संमेलन काटली येथे मोठया उत्साहात संपन्न

लोकप्रसिद्ध जेष्ठ साहित्यिक, कवी तथा दिग्गज मान्यवरांची उपस्थिती

 

गडचिरोली (काटली) :– सत्र- 2025 या वर्षीचे झाडीबोली साहित्य संमेलन 33 वे झाडीबोली केंद्रीय समिती साकोली यांचे निर्णयानुसार गडचिरोली जिल्ह्यातील मौजा काटली येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत साहित्य संमेलन दिनांक 27 डिसेंबर शनिवार व 28 डिसेंबर रविवार रोजी आयोजित संमेलन मोठया थाटामाटात उत्साहाने साजरा करण्यात आला.
या संमेलनाचे अध्यक्ष डॉ.धनराज ल. खानोरकर जेष्ठ साहित्यिक, लेखक, कवी तथा झाडीबोली भाषाकार उदघाटक डॉ. मिलिंद नरोटे आमदार गडचिरोली विधानसभा क्षेत्र, मा. हिम्मतसिंह बेदला रेसिडेन्ट डायरेक्टर लॉयल्ड मेटल्स ली. कंपनी,प्रमुख पाहुणे प्रांचित सावकार पोरेडीवार अध्यक्ष मध्य. सहकारी बँक, पदमश्री डॉ. परशुराम खुणे, डॉ. हेमकृष्ण कापगते माजी आमदार, गट विकास अधिकारी अनिकेत पाटील, तथा विविध जेष्ठ साहित्यिक, कवी, आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाची सुरवात पथसंचालन करीत पुस्तकंपोहा ग्रंथदिंडी काढून साजरी करण्यात आली.

दोन दिवसीय झाडीबोली साहित्य संमेलनाचे ठरलेल्या रूपरेषेनुसार 1 ते 9 टप्यात विविध मान्यवरांच्या माध्यमातून विविध विषयांवर उधबोधनात्मक कार्यक्रम साजरे करण्यात आले.
अनेक लोकप्रिय साहित्यिक व कविनी आपल्या कविता सादरीकरण करून उपस्थित्यांचे मन जिंकले.
विविध मान्यवारांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
यामध्ये झाडीबोली साहित्य मंडळ शाखा चामोर्शी चें अध्यक्ष सौं. भारती तितरे, उपाध्यक्ष प्रा. सुखसागर एम. झाडे, सल्लागार श्री, माणिकचंद रामटेके यांनी सुद्धा सहभाग घेत उत्कृष्ट कविता सादरीकरन करीत मान्यवरांचे मन जिंकले.
या वेळी मान्यवरांनी झाडीबोली साहित्य मंडळाची व्याप्ती प्रत्येक खेडोपाड्यातील घराघरा पर्यंत झाडी बोलीचे महत्व पोहचवून झाडी बोली भाषेला अग्रस्थानी पोहचवून येत्या काळात झाडी बोलीला अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा मानस उपस्थित मान्यवरांनी विषद केला.

झाडीबोली ची बहिणाबाई, सौं. अंजलीबाई खुणे वय 80 वर्षे यांनी आपल्या कवितेचे एवढं सुंदर मार्मिक शब्दरचनेत सादर केलेल्या कविता जणू नवयुवक कवी वर्यांना प्रेरित करणारे खरं आधारस्तंभ ठरेलं. त्यांची साहित्य कवितेची लगन आजही तेवढ्याच ताकतीने मांडताना बघून उपस्थित मान्यवर तथा प्रेक्षक मंत्रमुग्ध झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!