अंगणवाडी आधार प्रमाणीकरण्याच्या नावावर सायबर चोरट्याने घातला गंडा
चामोर्शी / सुखसागर झाडे
अंगणवाडी मार्फत 0 ते 6 वयोगटातील मुलांना सकस आहार पुरवठा दिला जातो. आहार मिळावा यासाठी लाभार्थ्यांचे ऑनलाईन वेरिफिकेशन केल्या जाते.
आधार प्रामाणिकरण करताना लाभार्थ्यांच्या मोबाईल वर ओटीपी मागितला जातो.
अशाच बाबींचा फायदा घेत सायबर चोरट्यानी चामोर्शी तालुक्यातील फोकुर्डी, नावेगाव माल, मुरखळा येथील जवळपास 14 लाभार्थी पालकांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पैसे उडवण्याचा धकादायक प्रकार समोर आला आहे.
फोकुर्डी येथील केशव गोहणे, यांच्या खात्यातून 42 हजार रु. तर विजय झाडे यांच्या खात्यातून 12 हजार 519 रु. सायबर गुन्हेगारांनी लंपास केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
लाभार्थी पालकांनी कोणालाही मोबाईल वर ओटीपी सांगू नये. अंगणवाडी सेविका प्रत्यक्ष घरी येऊनच आधार वेरिफिकेशन असो कि अन्य कोणतेही काम असो, त्याबाबतचा ओटीपी घेतील तेव्हाच सांगावा असे ऑनलाईन कुणालाही ओटीपी देऊ नये. – विनोद हाटकर
बालविकास प्रकल्प अधिकारी, चामोर्शी








