Home गडचिरोली गडचिरोली : तंत्रशिक्षणाच्या नव्या युगाचा प्रारंभ!

गडचिरोली : तंत्रशिक्षणाच्या नव्या युगाचा प्रारंभ!

0
118

गडचिरोली : तंत्रशिक्षणाच्या नव्या युगाचा प्रारंभ!

​आज गडचिरोलीच्या विकास प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला! गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स ॲण्ड एनर्जी लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने (PPP Model) अडपल्ली येथे साकारलेल्या ‘विद्यापीठ तंत्रज्ञान संस्था’ (UATI) चे भव्य उद्घाटन राज्याचे लाडके मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाले.
​या सोहळ्याला उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण शैक्षणिक क्रांतीचा साक्षीदार होता आले, याचा मला सार्थ अभिमान आहे.
​या प्रकल्पाचे महत्त्व:
​कौशल्य विकास: स्थानिक आदिवासी आणि ग्रामीण युवकांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळतील.
​रोजगार संधी: थेट उद्योगांशी निगडित शिक्षण मिळाल्याने रोजगाराचे मार्ग सुकर होतील.
​जिल्ह्याचा कायापालट: गडचिरोली जिल्हा आता केवळ नैसर्गिक संपत्तीसाठीच नव्हे, तर ‘टेक्नॉलॉजी हब’ म्हणून ओळखला जाईल.
​आमच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी आता तांत्रिक शिक्षणासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज उरणार नाही; जागतिक दर्जाचे शिक्षण आता त्यांच्या दारात उपलब्ध झाले आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत!

​याप्रसंगी गडचिरोली सह पालकमंत्री अँड. आशिषजी जयस्वाल, राज्याचे राज्यमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर, माजी खासदार डॉ. अशोकजी नेते भाजपा जिल्हाध्यक्ष श्री रमेशजी बारसागडे, आमदार श्री. धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार डॉ देवरावजी होळी, माजी आमदार श्री. कृष्णाजी गजबे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस अधीक्षक श्री. निलोत्पल, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, लॉयड्स मेटल्सचे एमडी बालसुब्रमण्यम प्रभाकरन व इतर मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!