Home गडचिरोली रोहित पाल यांचे एमपीएससी परीक्षेत घावघवीत यश…

रोहित पाल यांचे एमपीएससी परीक्षेत घावघवीत यश…

0
165

रोहित पाल यांचे एमपीएससी परीक्षेत घावघवीत यश…

कांग्रेस पदाधिकारी तथा सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार

चामोर्शी / सुखसागर झाडे

तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे ज्येष्ठ सदस्य रविंद्रभाऊ पाल (रा. ठाकूरनगर) यांचे सुपुत्र रोहित रविंद्र पाल यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशासाठी त्यांनी केलेली सातत्याने अहोरात्र मेहनत, स्वप्नपूर्तीची लगन,जिद्द चिकाटीने यशाला गवसणी घातली आहे.
त्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्रेरणा स्रोत आई-वडिलांसह त्यांचे स्वप्नपूर्ती साठी मदत करणारे शिक्षक यांना दिले. या मिळालेल्या यशामुळे त्यांनी गाव व तालुक्याचे नाव उज्वल केले आहे.
या यशाबद्दल काँग्रेस पक्ष व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने रोहित पाल यांचा सत्कार करण्यात आला. नगरपंचायत बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश ठाकूर, नगरपंचायत उपाध्यक्ष लोमेश बुरांडे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निकेश गद्देवार, काँग्रेस मीडिया प्रमुख विजय लाड, वॉईस मीडिया प्रतिनिधी धनराज वासेकर आदी मान्यवरांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन रोहित पाल यांचा गौरव केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोहित पाल यांच्या यशाचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. रोहित पाल यांचे यश हे तालुक्यातील युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत मान्यवारांनी यावेळी व्यक्त करण्यात केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!