Home गडचिरोली फोकुर्डी जवळ रस्त्यावर विटाच्या तुकड्यानी भरलेला टॅक्टर पलटला, सुदैवाने जीवितहानी टळली

फोकुर्डी जवळ रस्त्यावर विटाच्या तुकड्यानी भरलेला टॅक्टर पलटला, सुदैवाने जीवितहानी टळली

0
192

फोकुर्डी जवळ रस्त्यावर विटाच्या तुकड्यानी भरलेला टॅक्टर पलटला, सुदैवाने जीवितहानी टळली

चामोर्शी l सुखसागर झाडे

आज दिनांक 24/12/2025 ला सकाळी 8 वाजेच्या सुमारास चामोर्शी वरून वाघोली रेती घाटावर रेती वाहतुकी करिता बाधा निर्माण झालेल्या वैनगंगा नदीखोऱ्यातील रस्त्यावर रेती नेणारे टॅक्टर फ़सू नये म्हणून MH-33-F-4763 क्रमांक असलेले टॅक्टर नी व हायवा च्या साहाय्याने विटाचे तुकडे भरून जात होते.
चामोर्शी ते मूल मार्गावर असलेल्या फोकुर्डी गावाजवळ टॅक्टर चालकांनी मागून येणाऱ्या पीकअप ला साईड देण्याच्या नादात चालकाचा गाडीवरील नियंत्रण बिघडल्याने रस्त्याच्या कडेला टॅक्टर पलटी मारली. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.
टॅक्टर चालक समय सुचक बुद्धीचा वापर करीत कसा बसा सादर अपघातातुन आपला जीव वाचवून व सदर घटना स्थळवरून पलायन केले.

सदर MH-33-F-4763 क्रमांकची टॅक्टर ही रुपेश चलाख
रा. दहेगाव चामोर्शी यांच्या मालकीची असल्याचे उपस्थित जमावातील नागरिकांचे म्हणणे होते.

सदर घटनेची माहिती पोलीस विभागाला मिळताच सदर घटना स्थळ गाठून पोलीस विभागाच्या वतीने पुढील तपास सुरु आहे.

चामोर्शी ते हरणघाट या रस्त्याची स्थिती ही एवढी भयानक आहे कि त्या रस्त्यावरून वाहनाने प्रवास करणारे प्रत्येक प्रवासी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो हे विशेष बाब आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!