महिला बचत गटाची दंबग कामगिरी
अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकून मुद्देमाल केला जप्त
चामोर्शी, सुखसागर झाडे :- वाघधरा गावात अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढलेले बघून संतप्त झालेल्या महिला वर्गांनी सदर बाबींवर विचार विनिमय करून फिल्मी स्टाईलने अवैध दारू विक्रेत्यांच्या घरावर धाड टाकण्याचा निर्णय घेतला.
अक्षरश: अवैध दारू मुळे गावात नव जवान युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जाऊ लागला.
अवैध दारू मुळे वाढत असलेल्या सामाजिक समस्यांना आळा घालण्यासाठी वागदरा येथे महिला बचत गटाने पुढाकार घेत दारू विक्रेत्यांवर धाड घातली.
या कारवाईत चार आरोपींच्या घरी शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यांच्या घरातून देशी दारूच्या निपा व मोहफुलांची दारू आढळून आली.
महिला बचत गटातील महिलांनी सर्व जप्त दारूसह थेट पोलिस ठाणे गाठत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
त्यानुसार नानाजी अंकतवार, कविता मडावी, घनश्याम मेश्राम आणि ललिता रवी माझी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही बीट जमादार दुर्गे मेजर, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू वाळके, ग्रामपंचायत सदस्य परशुराम कुळमेथे, पोलीस पाटील अनिल कुकुडकर तसेच दिनेश मडावी यांनी सहकार्य केले.
महिला बचत गटाच्या या धाडसी भूमिकेचे गावकऱ्यांकडून कौतुक करण्यात येत असून अवैध दारूविक्रीविरोधात कडक कारवाईची मागणी होत आहे.
प्रत्येक गावातील महिला बचत गटाच्या वतीने सदर प्रकरणाचे अवलोकन करून आपल्या अंगातील झाशी च्या राणीला जागृत केले तर आपल्या गावा-गावात अशी मोहीम राबवली तर तालुकाच काय अखां जिल्हा दारूमुक्त करतील असे जाणकार सुजान नागरीकांचे मत आहे.









