Home चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदनाची दखल…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदनाची दखल…

0
127

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निवेदनाची दखल…

शेतकऱ्यांचे होल्ड केलेले खाते पूर्ववत सुरू करण्याचे स्टेट बँकेने दिले आश्वासन

सय्यद शब्बीर जागीदार यांच्या प्रयत्नांना यश

जिवती :-आज दि.११ डिसेंबर रोजी तहसीलदार जिवती तसेच भारतीय स्टेट बँक शाखेचे मॅनेजर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात शेतकऱ्यांची लॉक असलेले त्वरित खाते सुरू करा. अन्यथा बँकेला घेराव आंदोलन छेडू असा थेट इशारा दिला होता. त्यामुळे मागणीची दखल घेऊन बँक मॅनेजर आशिष यादव यांनी निवेदनकर्त्यासोबत सकारात्मक चर्चा करून आश्वासन दिले की ज्यांच्या खात्यावर होल्ड लावण्यात आले त्यांच्या खात्यात श्रावण बाळ योजना, किसान सन्मान निधी, नुकसान भरपाई निधी, रोजगार हमी निधी, घरकुल निधी जमा झाली असेल तर त्यांना बँकेतून व्यवहार करण्यास अडचण येणार नाही.अशी आश्वासन भारतीय स्टेट बँकेचे मॅनेजर यांनी दिले. तहसीलदार रूपाली मोगरकर मॅडम जिवती यांनीही बँकेला होल्ड हटवण्यासाठी सूचना देतो असे आश्वासन दिले. म्हणून जिवती तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावण्यात आले असेल व त्यांच्या खात्यात शासनाची मदत निधी जमा असेल त्या शेतकऱ्यांनी स्टेट बँक पाटण येथे संपर्क करावा असे आव्हान सय्यद शब्बीर जागीरदार, विजय गोतावळे, आरिफ शेख, बापूराव राठोड, राम चव्हाण, शांत कुमार गोरे, रोहिदास तोगरे, दीपक सूर्यवंशी, राजू राजपंग्गे, भावसिंग आडे, विष्णू हामपल्ले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका जिवती च्या वतीने करण्यात आले आहे‌.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!