Home गडचिरोली धर्म विभाजनासाठी नसून जोडण्यासाठी असले पाहिजे – अनुप कोहळे

धर्म विभाजनासाठी नसून जोडण्यासाठी असले पाहिजे – अनुप कोहळे

0
100

धर्म विभाजनासाठी नसून जोडण्यासाठी असले पाहिजे – अनुप कोहळे

अनंतपुर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी 

चामोर्शी, सुखसागर झाडे

चामोर्शी :: महाराष्ट्रात संत-महात्म्यांची ज्ञान, भक्ती आणि समता यांची संपन्न परंपरा आजही समाजप्रबोधनाचे कार्य सातत्याने करत आहे. विज्ञानवादी विचार, अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक सलोखा व मानवतेचा संदेश देणाऱ्या संतांनी समाजाला योग्य दिशा दिली. “धर्म हा माणसाला विभाजन करणारा नसून, माणसामाणसातील प्रेम, बांधिलकी आणि बंधुता वाढविणारा असावा”, असे मत यावेळी व्यक्त केले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपसरपंच काशिनाथ बुरांडे उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून श्री गिरमाजी दुधबावरे, श्री विनोद पांडे (व्यसनमुक्ती समुपदेशक), श्री दिवाकर बरसागडे (निमडर टोला), हरीदास वासेकर, श्री गुरुदास गलाई, श्री रोषण बरसागडे, बाळाभाऊ दुधबावरे, सौ. रजुताई बोदलकर (अंगणवाडी सेविका), श्री सोमाजी दुधबावरे, श्री गुलाबसिंग धोती सर, श्री राजु नरताम, श्री दशरथ कुनघाडकर, श्री संतोष नरताम, श्री सुनिल बुरांडे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सरिता नैताम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!