Home चंद्रपूर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

0
205

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते : विवेक बोढे

घुग्घुस: येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव, युगपुरुष, बोधिसत्व, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.

मनोगत व्यक्त करतांना भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे म्हणाले, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समतेचा संदेश देत बहुजनांच्या हक्कासाठी लढा दिला. अस्पृश्यता हा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. देशाच्या विविध क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे त्यांना आधुनिक भारताचे निर्माते असे म्हणतात.

यावेळी भाजपाचे सिनू इसारप,विवेक (गुड्डू) तिवारी, हेमंत कुमार, गणेश राजूरकर, उमेश दडमल, रवी घोडके, योगेश घोडके, अजय लेंडे, निखिल आत्राम, शुभम वडस्कर, खुशबू मेश्राम, लता आवारी, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार, भारती परते, प्रिया नागभीडकर, मयुरी धुर्वे, जाई आत्राम आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!