Home चंद्रपूर भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष…

भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष…

0
382

भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैशाचे आमिष…

पांडूरंग चिल्लावार आपल्या घराच्या मागील चक्की शेडमधून पैसे वाटतांना व्हिडीओ व्हाॅयरल

राजुरा (ता.प्र.) :- राजुरा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ चे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील भाजप नेते पांडूरंग सावकार चिल्लावार हे निवडणूकीत ५०० रूपयांच्या नोटा मतदारांना वाटत असल्याचा विडीओ व्हायरल झाल्याने येथे खळबळ उडाली आहे. या बाबत निवडणूक विभागाकडे तक्रार काॅग्रेस नेते सुरज ठाकरे यांनी केली आहे, मात्र अद्याप यावर काही कार्यवाही विषयी माहिती मिळू शकली नाही.
पांडूरंग चिल्लावार यांचा मुलगा अमोल हा नगरसेवक पदासाठी उभा आहे. याच प्रभागातून प्रिती रेकलवार या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत. चिल्लावार यांचे घराचे मागे असलेल्या पिठाच्या चक्कीच्या शेड मधून हे वाटप होत असल्याचे काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. प्रत्येक मतदाराला दोन हजार प्रमाणे दिले गेले. ही टोकन अमाउंट असल्याचा दावा काहींनी केला. या व्हिडीओ मध्ये चिल्लावार यांचे हातात पाचशे रूपयांची गड्डी दिसत आहे.


रक्कमेचे वाटप सुरू असल्याची तक्रार आली आहे. ही तक्रार व व्हिडीओ आचारसंहिता प्रमुख यांचेकडे पाठविली आहे. ते सध्या फिल्ड वर असून चौकशी करीत आहेत. – ओमप्रकाश गोंड,
तहसीलदार तथा नगर पालिका निवडणूक प्रमुख, राजुरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!