Home चंद्रपूर शंकरपूर परिसरातील वाघाचा तात्काळ जेरबंद करा करा शुभम मंडपे यांची मागणी

शंकरपूर परिसरातील वाघाचा तात्काळ जेरबंद करा करा शुभम मंडपे यांची मागणी

0
136

शंकरपूर परिसरातील वाघाचा तात्काळ जेरबंद करा करा शुभम मंडपे यांची मागणी

चार दिवसात जेरबंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार

चिमूर/तालुका प्रतिनिधी

पंधरा दिवसापासून शंकरपूर परिसरात वाघाची धुमाकूळ चालू आहे आणि त्यामुळे शंकरपूर,,चिचाळ कुणबी आजगाव पाचगाव साठगाव, कोलारी, जवराबोळी,परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले डॉ. प्रभाकर चौधरी यांच्या घरी गावामध्ये घुसून गाईला ठार मारले व तसेच आज दिनांक एक 12 2025 ला मौजा आजगाव येथील नामदेवजी घ्यार यांच्या शेतात बैलाला वाघाने ठार मारले त्यामुळे शेतकऱ्यांची शेतात जाणे बंद झाले आहे,कापूस काढणीला शेतमजूर मिळत नाही असे असणारी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे सागाव कोलारी चिचाळा कुणबी आजगाव पाचगाव खैरी, शंकरपूर परिसरात भीतीचे वातावरण असल्यामुळे वाघाला तात्काळ जरबंद करावी याची मागणी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी केली आहे

सतत पंधरा दिवसापासून शंकरपूर पर्यंत परिसरामध्ये पाळीव प्राण्यावर हल्ला करून ठार केल्याच्या घटना घडत आहेत मात्र याकडे कुठेतरी वन विभागाचे खूप मोठे दुर्लक्ष होत आहे भीतीचे वातावरण असल्यामुळे वंचीचे युवा जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी माननीय देऊळकर यांची तात्काळ भेट घेतली व शेतकऱ्यांची शेतमजूरांची समस्या सांगून तात्काळ त्या वाघाला जेरबंद करा याची मागणी केली व निवेदन देऊन चार दिवसाच्या आत वाघाला जेरबंद न केल्यास कान्पा-शंकरपूर -चिमुर राष्ट्रीय महामार्गांवर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मा.किशोर देऊळकर यांनी तात्काळ मागणी मान्य केली व त्या वाघाला तात्काळ जेरबंद करण्याचे आश्वासन दिले यावेळी निवेदन देतांना वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम मंडपे, शंकरपूर चे उपसरपंच अशोक चौधरी, प्रज्वल राऊत, देवराव चौधरी, जोगेंद्र कडू, अवीभाऊ बारोकर, रुपेश कडू, नकुल राऊत, उद्धव खाडे, सुरेश गरमळे,सारंग कडू,मनोज सरदार, उमेश देशकर, सचिन ग्यारं आदी शेतकरी उपस्तित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!