शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा
चामोर्शी – सुखसागर झाडे
संविधान दिन भारतभर साजरा केला जातो, फुल नाही तर फुलाची पाकळी या युक्ती प्रमाणे स्थानिक शरदचंद्र पवार कला महिला महाविद्यालयाच्या वतीने मोठ्या सन्मान पुर्वक भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासुर्य,क्रांतीसुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मालार्पन व पुष्पगुच्छ अर्पण करून महामानवास मानवंदना देत सामुहिक संविधान प्रास्ताविकतेचे वाचन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून महाविद्यालयाच्या
प्राचार्या शिल्पा काशेट्टिवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, २९ ऑगस्ट १९४७ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका अन चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला.
🇮🇳भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तो लिखित आणि जगातील सर्वात मोठी राज्यघटना आहे. यामध्ये ताठरता व लवचिकतेचा समन्वय आहे. संसदीय शासनपद्धती, मूलभूत हक्क, प्रौढ मताधिकार आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था यांचा समावेश आहे. तसेच, भारतीय संविधान धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि लोकशाही प्रजासत्ताक आहे.
प्रमुख वैशिष्ट्ये
लिखित आणि सर्वात मोठी राज्यघटना: भारताची राज्यघटना लिखित आहे आणि जगातील सर्वात मोठ्या राज्यघटनांपैकी एक आहे.
ताठरता आणि लवचिकतेचा समन्वय: यात काही बदल करणे कठीण आहे, तर काही बदल सहजपणे करता येतात, ज्यामुळे ते ताठर आणि लवचिक दोन्ही आहे. संसदीय शासनपद्धती: केंद्र आणि राज्यांमध्ये संसदीय शासनपद्धती लागू आहे.
मूलभूत हक्क: नागरिकांना ६ मूलभूत हक्क दिलेले आहेत, जे राज्य सरकारच्या मनमानी कारभारापासून त्यांचे संरक्षण करतात. प्रौढ मताधिकार: १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. संघराज्य शासनपद्धती: संघराज्य आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी आहे. स्वतंत्र न्यायव्यवस्था: न्यायपालिका कोणत्याही दबावाशिवाय स्वतंत्रपणे कार्य करते.
धर्मनिरपेक्ष राज्य: राज्याला कोणताही विशिष्ट धर्म नाही आणि सर्व धर्मांना समान वागणूक दिली जाते.
समाजवादी आणि लोककल्याणकारी राज्य: सामाजिक आणि आर्थिक न्याय सुनिश्चित करणे हे संविधानाचे उद्दिष्ट आहे. अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्या शिल्पा काशेट्टिवार यांनी आपले संविधान सल्गनीत विचार मांडले.
यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. बि. व्ही. धोटे, प्रा. नोमेश्वर झाडे, डॉ. प्रा. मिराताई वाघमारे, प्रा. कृणाल आंबोरकर,प्रा.दगडु गुडदे, प्रा.सुखसागर झाडे, नितेश पोरटे, सौरभ सहारे,संजय गडकर, लोभेश गोर्लावार, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थींनी उपस्थिती होत्या.









