शेकडो भाजपा कार्यकर्त्यांचा घुग्घूस काँग्रेस पक्षात प्रवेश!
नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद वाढली
घुग्घूस : शहरात नगरपरिषदेच्या निवडणुका लागल्या असून राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोइंग जोरात सुरू झालेले आहेत.
शहरातील भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष संजय तिवारी यांचे खंदे समर्थक श्रीप्रकाश निषाद यांनी आपल्या शेकडो पदाधिकाऱ्यांन सोबत काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेवत खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी मंत्री विजय वड्डेटीवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, काँग्रेस शहर अध्यक्ष राजुरेड्डी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिप्तीताई सोनटक्के यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला यासोबतच सामाजिक कार्यकर्त्यां सरिता विशाल खैरे यांनी ही काँग्रेस पक्षात घेतला या पक्ष प्रवेशाने वेकोलीच्या इंदिरा नगर परिसरात काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे.
याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार, सुजित सोनटक्के, निखिल पुनघंटी, पूनम कांबळे, प्रिती तामगाडगे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.








