Home गडचिरोली ग्रामीण भागात डिजिटल युगातही लोककला ‘दंडारीला’ पसंती

ग्रामीण भागात डिजिटल युगातही लोककला ‘दंडारीला’ पसंती

0
271

ग्रामीण भागात डिजिटल युगातही लोककला ‘दंडारीला’ पसंती

आई तु माझी होशील का? या दंडारीचा प्रयोग बघण्यासाठी प्रेक्षकांच्या गर्दीचा महासागर

चामोर्शी : सुखसागर झाडे 

गुलाबी थंडीची चाहुल लागली की, ग्रामीण भागामध्ये परंपरागत लोककला युक्त दंडार, नाटक बघण्यासाठी प्रेक्षकांना जणू ओळ लागताना दिसते.
याचाच एक नमुना म्हणजे दि. १०/११/२०२५ ची रात्र चामोर्शी तालुक्यातील मौजा वाघोली येथे संपन्न झालेला “आई तु माझी होशील का❓ ” या दंडारीचा प्रयोग पाहण्यासाठी जमाव झालेला जनसमुदाय आजही लोककलेला वाव देताना दिसून आला.
सध्या डिजिटल युगातही लोककला जतन करण्यात समर्थक असताना दिसुन येते.
पुर्वी मनोरंजन साधनाचा अभाव असल्यामुळे ग्रामीण भागात करमणुकीचे साधन म्हणून दंडार,प्रयोगास लोकं आकर्षीत होत होते. गुलाबी थंडीची चाहुल लागली की, ग्रामीण भागातील लोकांची शेतकरी लोकांची धान कापणी बांधणी च्या कामाला सुरुवात होत होती. शेतकरी कामगार शेतात राबराब राबुन कष्ट उपसित होता.हा काळ म्हणजे सुगीच्या दिवसांची सुरवात होत असे बळीराजा च्या घरी शेतातील पिकवलेला माल (अनाज) येत असे व आनंदाचा क्षणाची उत्सुकता म्हणून असे दंडार प्रयोगाचे आयोजन केले जात असे.
परंतु आजही हि परंपरा मोठ्या उत्साहाने साजरी करीत असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.
जय रंग देवता नाट्य दंडार मंडळ वाघोली च्या सौजन्याने, जय बजरंग बली नाट्यकला चेक बोरगांव प्रस्तुत:- “आई तु माझी होशील का❓ या दंडारीचा प्रयोग सादर करण्यात आला.
या दंडारीच्या प्रयोगाला उद्घाटक म्हणून राजेश्वर चुधरी भाजप चे दावेदार जि. प. उमेदवार, नरेंद्र जुवारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट. अध्यक्ष म्हणून दिगांबर धानोरकर कांग्रेस पक्षाचे दावेदार उमेदवार, मनोजभाऊ पोरटे शिवसेना तालुका प्रमुख (दावेदार जि प.), सोनीताई किरमे सरपंच वाघोली. कुंदाताई जुवारे सरपंच भेंडाळा, राहुल पोरटे उपसरपंच वाघोली, भावना पत्रुजी पाल, रविंद्र गायकवाड वनरक्षक, पुरुषोत्तम पोरटे से. नि. कर्मचारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
या दंडारीच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भुषण पोरटे यांनी केले व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!