ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या वतीने ‘सामुहिक रजे’चे निवेदन तहसीलदार यांच्या कडे सुपुर्द
विविध प्रलंबित मागण्या शासनाच्या वतीने पुर्ण होणार नाही तो पर्यंत सामुहिक रजा घेत बेमुदत आंदोलन विदर्भ पटवारी संघटनेचा इशारा
चामोर्शी l सुखसागर झाडे
महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी हे शासन व शेतकरी यांच्या मधील अतिशय महत्वपूर्ण दुवा आहे.
ग्राम महसूल अधिकारी हा महसूल विभागा अंतर्गत चालणाऱ्या विविध योजनांची गावपातळीवर अंमलबजावणी करून जिवाचे रानं करीत आपले चोख कर्तव्य बजावीत असतो.
महसूल दस्तऐवज बरोबरचं अनेक नैसर्गिक तारांकित उद्भवणाऱ्या येणाऱ्या समस्या वर तात्काळ सेवा देताना तारेवरची कसरत करावी लागते.
आपले कर्तव्य पार पाडताना विविध गावपातळीवरील तसेच प्रशासकीय बाबींचा सामना करताना अनेकांना तोंड देत तोडगा काढताना त्यांस मोठी दमछाक करावी लागत असते.
तरी पण प्रशासनाला व शासनाला त्याची किंमत नाही.
त्यांच्या रास्त मागण्याला केराची टोपली दाखवली जात आहे विविध मागण्या ची मागणी करुन त्रस्त झालेल्या महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी आता अखेर सामुहिक रजा वर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
विदर्भ ग्राम महसूल संघटनेच्या वतीने मा. जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी संवर्गक सेवा विषयक व आर्थिक प्रलंबित मागणी संदर्भात दि. १५/०९/२०२५ ला निवेदन सादर केले परंतु त्यावर काहीचं उपाययोजना न झाल्याने आज दि. १०/११/२०२५ रोजी संघटनेच्या वतीने असे पाऊल उचलण्यात आले आहे.
महसूल मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी संघटणेच्या वतीने तहसील कार्यालय चामोर्शी येथे मा. प्रशांत घोरूडे तहसीलदार चामोर्शी यांना विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जोपर्यंत शासनाच्या वतीने महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करणार नाही तोपर्यंत सामुहिक रजा घेऊन अधिक तीव्र आंदोलन घेण्याचा पवित्रा संघटनेच्या वतीने घेण्यात येणार असा इशारा संघटनेच्या वतीने वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
सामुहिक रजा देताना उपस्थिती :- सामुहिक रजा चे निवेदन देताना विदर्भ पटवारी संघ उपविभाग शाखा चामोर्शीचे अध्यक्ष जी. जी. वनकर सचिव टीम.बी.झुरे विदर्भ पटवारी संघ तालुका शाखा चामोर्शी अध्यक्ष दिलीप पुंगाटी सचिव वैभव शेरकी सोबत यावेळी तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व महसुल मंडळ अधिकारी व महसुल अधीकारी उपस्थित होते.









