शिक्षकाची लेक “वैदवी “बनली चोवीसाव्या वर्षी सी ए
चामोर्शी शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
चामोर्शी, सुखसागर झाडे
मनात जिद्द व ध्येय असले तर उच्च शिखर गाठता येऊ शकतो. याचा प्रत्यय चामोर्शी येथील हनुमान नगरात राहणारी शिक्षकाची मुलगी वैदवी सिंगरेडीवार ही वयाच्या चोविसाव्या वर्षी सी ए परीक्षा उत्तीर्ण होत आपले उद्देश सफल केली.
याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक गोपाल सिंगरेडीवार हे अहेरी तालुक्यातील रहिवाशी असून त्यांची मुलगी वैदवी ही पहिली ते दुसरी पर्यंत चे शिक्षण सेंट फ्रान्सिस आलापल्ली येथे घेतले त्यानंतर वडिलांची बदली चामोर्शी तालुक्यात झाल्याने ते येथेच स्थानिक झाले त्यामुळे वैदवी ही तिसरी ते चौथी पर्यंत चामोर्शी येथील कारमेल अकॅडमी मध्ये शिक्षण घेतले त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंत येथील जे के बोमनवार विद्यालयात शिक्षण घेतले त्यानंतर ती पुणे येथील बी एम सी सी. कॉलेज मध्ये इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले तिची इच्छा उच्च शिक्षण घ्यावे म्हणून ती
सन २०२० मध्ये
सी ए फाऊंडेशन ची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाली ती मागे वळून न पाहता सन २०२१ मध्ये सी ए इंटरमिडेट ची परीक्षाही उत्तीर्ण केली तिचा आत्मविशास वाढत गेल्याने हार न मानता सन २०२५ मध्ये सी ए फायनल मध्ये उत्तीर्ण होत आपले ध्येय साध्य केले
ही गोड संदेश घेऊन थेट पुणेहून चामोर्शी येथे ०५ नोव्हेंबर रोजी स्वागावी निवासस्थानी येताच तिच्या यशाबद्दल वडील गोपाल सिंग्रेडीवार,आई स्मिता सिंगरेडीवार, आजी नलिनी येणप्रेडीवार, बहीण वैष्णवी गागरेड्डीवार कुटुंबीयांनी
व वार्डातील तिचे घराशेजारी, नातेवाईक, आदी तिचे जोरदार स्वागत केले तर सर्व शिक्षक आदींने तिचे अभिनंदन, कौतुक केले आहे.

मला लहानपणापासूनच उच्च शिक्षण घेऊन आपल्या आई वडिलांचे नाव उज्वल करण्यासाठी सी ए करण्याची इच्छा होती त्यानुसार मी अभ्यासात सातत्य ठेवून हे शिखर गाठले असून यात मला माझे सर्व शिक्षक, माझी बहिण, नातेवाहिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आता यापुढे मला प्रॅक्टीस करून स्वतःचा व्यवसाय करण्याचा मानस प्रतिनिधी शी बोलताना व्यक्त केला आहे.









