Home गडचिरोली अखेर सिरोंचा तहसिलदाराचे ‘तडका-फडकी’ निलंबन!

अखेर सिरोंचा तहसिलदाराचे ‘तडका-फडकी’ निलंबन!

0
205

अखेर सिरोंचा तहसिलदाराचे ‘तडका-फडकी’ निलंबन!

“उपरवाले वाले के पास देर है लेकीन अंधेर नही” हे सत्यवचन झाले सिद्ध…

तलाठी संघटनेचा संघर्ष अखेर रंगला ; महसूल विभागात खळबळ

सिरोंचा (गडचिरोली) l सुखसागर झाडे
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मददीकुंठ्ठा येथील कोट्यवधी रुपयांच्या अवैध वाळू साठा प्रकरणाला अखेर नाट्यमय वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुरुवातीला कनिष्ठ कर्मचाऱ्यांवरच कारवाईचा बडगा उगारत तलाठी व मंडळ अधिकारी यांना निलंबित करण्यात आले होते.

मात्र, “लहान कर्मचाऱ्यांनाच बळी का द्यायचा, मोठ्या अधिकाऱ्यांचे काय?” असा सवाल करत तलाठी संघटनेने धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी अधिक तीव्र केली आणि चौकशीदरम्यान अनेक नवीन बाबी उघडकीस आल्या.

विश्वसनीय सूत्रांनुसार, तहसीलदार निलेश होनमोरे यांच्या कार्यकाळात हा वाळू साठा प्रकार उघडकीस आला असून, त्याबाबत पुरावे मिळाल्याने महसूल विभागाने ‘तडका-फडकी’ निर्णय घेत थेट निलंबन आदेश जारी केला!

या घटनेमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
ठेकेदार, संबंधित अधिकारी आणि इतर जबाबदारांवरही कारवाईची मागणी आता जोर धरत आहे.

स्थानिक स्तरावर चर्चा सुरू आहे की,लहान कर्मचाऱ्यांना बळी देऊन मोठ्यांना वाचवण्याचा खेळ आता उघड झाला आहे!”

दरम्यान, या कारवाईनंतर तलाठी संघटना आणि कर्मचारीवर्गाने समाधान व्यक्त केले, तर दुसरीकडे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पितळ उघड होईल की काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!