Home गडचिरोली ‘वंदे मातरम्’ ची 150 वर्ष भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दीन महोत्सव संपन्न

‘वंदे मातरम्’ ची 150 वर्ष भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दीन महोत्सव संपन्न

0
118

‘वंदे मातरम्’ ची 150 वर्ष भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दीन महोत्सव संपन्न

नगरपंचायत चामोर्शी च्या वतीने मोठ्या थाटामाटात कार्यक्रमाचे आयोजन

 

चामोर्शी l सुखसागर झाडे

महाराष्ट्रातील 358 तालुक्यामध्ये 5000+ देशप्रेमीसोबत उत्साहात साजरा होणारा सार्ध शताब्दी महोत्सव नगरपंचायत च्या प्रांगणात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. प्रशांत घोरुडे तहसीलदार चामोर्शी, प्रमुख वक्ते मा.डाॅ.प्रा. चौथाले सर, प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष जयश्रीताई वायलालवार, उपनगराध्यक्ष लोमेशजी बुरांडे, नायब तहसीलदार मा. वैद्य सर, इतर पदाधिकारी व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रमुख वक्ते डॉ.प्रा.चौथाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आपल्या “वंदे मातरम्’ या घोषवाक्य बाबत विस्तृत माहिती देत भारत मातेचा गौरव करीत उपस्थित विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकली.
तसेच मातृभूमी,मातृभाषाबाबत आपुलकीची जान असावी.
देशप्रेम व महाराष्ट्र राज्याची संस्कृतीची मुल्ये जोपासने काळाची गरज आहे. आपल्या राष्ट्राप्रती सद्भावना असुया प्रत्येकांनी जोपासीत वर्तन केले तर सुजलाम सुफलाम राष्ट्र निर्माण नक्कीचं घडवण्यात प्रत्येकांचा सिंहाचा वाटा असेल असे प्रतिपादन करीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक विविधांगी असे मोलाचे मार्गदर्शन केले.
नगरपंचायतीच्या वतीने चालू सत्रात तालुका स्तरीय विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धेत अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम,द्वित्तीय,तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देत गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला चामोर्शी येथील स्थानिक विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपंचायतचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी मोलाची कामगिरी बजावत कार्यक्रम यशस्वी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!