Home चंद्रपूर राजुरा तहसील कार्यालयात ‘लाचलुचपत तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याच्या ‘नागवांश युथ फोर्स’...

राजुरा तहसील कार्यालयात ‘लाचलुचपत तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याच्या ‘नागवांश युथ फोर्स’ च्या मागणीला यश…

0
135

राजुरा तहसील कार्यालयात ‘लाचलुचपत तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याच्या ‘नागवांश युथ फोर्स’ च्या मागणीला यश…

 

राजुरा, ७ नोव्हे. :- तहसील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे ‘तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी नागवंश युथ फोर्स ने केली होती. या मागणीला यश आले आहे.
सध्या राजुरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ, प्रमाणपत्रे, महसुली कामे, जमीन विषयक नोंदी आदी कामासाठी तहसील कार्यालयात वारंवार ये – जा करावी लागते. या प्रक्रियेत नागरिकांना अनेकदा अडचनीला सामोरे जावे लागते. काही ठिकाणी शासकीय कामांसाठी अप्रक्षरित्या आर्थिक व्यवहार अथवा लाचलुचपत सदृश्य प्रकार घडत असल्याचा तक्रारी सातत्याने जनतेतून समोर येत आहेत. नागरिकांच्या तक्रारीवर तात्काळ, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होण्यासाठी तहसील कार्यालय राजुरा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावा अशी लोकहितकारी मागणी निवेदनातून नागवंश युथ फोर्स ने केली होती.
या मागणीची तातडीने दखल घेत तहसील कार्यालय राजुरा येथे “लाचलुचपत तक्रार निवारण” बाबत फलक लावण्यात आले आहे. या अनुषंगाने नागरिकांना आवाहन करण्यात आले असून चंद्रपूर संपर्क क्रमांक ०७१७२- २५०२५१ व नागपूर संपर्क क्रमांक ०७१२ – २५६७७० देण्यात आले आहे. या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क करण्याचे तहसील प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!