Home चंद्रपूर तहसील कार्यालय प्रशासनाचे राजुरा तालुक्यातील नागरिकांना जाहीर आवाहन…

तहसील कार्यालय प्रशासनाचे राजुरा तालुक्यातील नागरिकांना जाहीर आवाहन…

0
231

तहसील कार्यालय प्रशासनाचे राजुरा तालुक्यातील नागरिकांना जाहीर आवाहन…

 

राजुरा तालुक्यातील सर्व नागरिकांना कळवण्यात येते की Tata Institute of Fundamental Research आणि केंद्र शासनाची संस्था इस्रो (ISRO) यांचे वतीने विशिष्ट वैज्ञानिक उपकरणांचे ऊंच हवेमध्ये परीक्षण करण्या करिता सदर उपकरणे मोठ्या आकाराच्या बलून (फुगा) द्वारे सदर संस्थेच्या हैद्राबाद येथील मुख्यालयातून आकाशात सोडण्यात येणार आहेत.
सदर उपकरणे परीक्षण पूर्ण झाल्यानंतर जमिनीवर परत येतील तेव्हा ती हैद्राबाद पासून साधारण 350 km च्या परिघामध्ये कुठेही बलून (फुगा) द्वारे जमिनीवर उतरतील. त्यामुळे राजुरा तालुक्यातील काही गावांमध्ये, शेत शिवारामध्ये ही ही उपकरणे उतरण्याची शक्यता आहे.
सदर मोहीम 25 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान होणार आहे

त्यामुळे *अशी उपकरणे निदर्शनास आल्यास नागरिकांनी तात्काळ आपले तलाठी/ग्रामसेवक/ पोलिस पाटील तसेच तहसील कार्यालय व पोलीस स्टेशन येथे संपर्क करून कळवावे असे जाहीर आवाहन करण्यात येत आहे.*

तसेच सदर उपकरणे ही अत्यंत महत्त्वाची, मौल्यवान असून आपल्या देशाची संपत्ती आहे त्यामुळे त्या उपकरणांसोबत कुठलीही छेडछाड करू नये ही विनंती.
सदर उपकरण आपल्या भागात उतरले तर कुणीही घाबरून जाऊ नये याकरिता हे जाहीर आवाहन करण्यात येत असून ते जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचावे याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे ही विनंती.

तसेच सदर उपकरणे आपल्या भागात मिळून आल्यास व त्याबाबत प्रशासनास माहिती देऊन सहकार्य केल्यास संबंधित नागरिकांना सदर संस्थेच्या वतीने बक्षीस पण देण्यात येणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता किंवा अफवा न पसरवता या राष्ट्रीय कार्यास सहकार्य करावे असे प्रशासनाच्या वतीने जाहीर आवाहन करण्यात येत आहे.

तहसीलदार राजुरा
7276993051

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!