शेतकऱ्यांची काळी दिवाळी — भाकर, पिठलं, ठेचा खाऊन निषेध

बल्लारपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार आज बल्लारपूर शहर व तालुक्यात शेतकऱ्यांनी “काळी दिवाळी” साजरी करत अनोखा निषेध नोंदवला.
शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही मदत रक्कम न आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर भाकर, पिठलं आणि ठेचा खाऊन सरकारविरोधात नाराजी व्यक्त केली.
या आंदोलनात प्रदेश पदाधिकारी सचिव घनश्याम मुलचांदनी, शहर अध्यक्ष देवेन आर्य, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, महिला तालुका अध्यक्ष अपसाना सय्यद, भास्कर माकोडे, प्रणेश अम्राज, रवी देरकर, सुरेश बाप्पांवर, तुळशीराम पिपरे, सुरेश वासाडे, नरेश बुरांडे, वासुदेव येरगुडे, शेखर आलम, जिवंकला आलम, भास्कर कावळे, सूर्यकांत दयालवर, नाजुका आलम, सुनील कोहरे, कैलाश धानोरकर यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले.








