Home चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण व...

आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण व “दिवाळी पहाट” कार्यक्रम उत्साहात संपन्न

0
121

आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण व “दिवाळी पहाट” कार्यक्रम उत्साहात संपन्न

म्हाडा कृती समितीचे आयोजन

नवीन चंद्रपूर परिसरात म्हाडा कृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक फलक अनावरण सोहळा व सुरेल मराठी गीतांचा “दिवाळी पहाट” कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी म्हाडा कृती सेवा समितीचे अध्यक्ष प्रफुल टोंगे, भाग्यवान गणफुले, राहुल तायडे, अजय हिरादेवे, पडोलीचे सरपंच विक्की लाडके, अनिल नरुले, भारतीय जनता पार्टीचे नेते नामदेव डाहुले, गुड्डू सिंग, नकुल वासमवार आदींची उपस्थिती होती.
या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. नागरिकांनी “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमवून टाकला. राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे चौकाचे नामकरण करण्यात आल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
यानंतर मराठी संगीताची परंपरा आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा “दिवाळी पहाट” कार्यक्रम पार पडला. मराठी संस्कृतीचा आणि परंपरेचा गौरव करणाऱ्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फर्त प्रतिसाद मिळाला.
या प्रसंगी आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांचा आदर्श विचार समाजात जोपासला पाहिजे. ‘दिवाळी पहाट’ सारखे सांस्कृतिक कार्यक्रम मराठी संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे कार्य करतात. समाजात आनंद आणि ऐक्य निर्माण करणारे हे उपक्रम अभिनंदनास पात्र आहेत, असे ते म्हणाले. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!