उमेद अभियाना अंतर्गत महीला समुहाचा स्तुत्य उपक्रम
दिपावलीच्या शुभपर्वाचे औचित्य साधुन विविध फराळाची विक्री करीत साध्य केला आर्थिक नफा
चामोर्शी : सुखसागर झाडे
महाराष्ट्र शासन ग्रामोन्नती उमेद अभियान पंचायत समिती चामोर्शी च्या वतीने तालुका अभियान व्यवस्थापक तुषार कर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी दिपावली च्या शुभमुहूर्ताच्या अनुषंगाने विविध स्वयंसहायता महिला समुहाच्या वतीने चामोर्शी बाजारपेठत मुख्य रस्त्याच्या कडेला जि. प. हायस्कूल च्या जवळील भागात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या स्टाॅल, चलते फिरते दुकाने लावण्यातआले.
चामोर्शी वासिय तथा बाहेरुन तालुका ठिकाणी आवागमन करणाऱ्या जनतेनी सदर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत, मनचाहे पसंदिदा विविध प्रकारची फराळाची मोठ्या प्रमाणात खरेदी करून महिला समूहांना आर्थिक उन्नती साधण्यास सहाय्य केले आहे.
या अंतर्गत व्यवसाया बाबत महीलांना व्यवसाय, विविध कुटिरोद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे उद्दिष्ट सफल झाल्याचे संबधित अधिकारी यांचे मत आहे.
या खाद्यपदार्थ व्यवसायातुन स्वयंसहाय्यता महीला समूहांना दोन दिवसांत जवळपास ९२००० हजार रुपयांचा आर्थिक लाभ झाला आहे. असे मत प्रभाग समन्वयक एकनाथ सेलोटे यांनी व्यक्त केले.
यावेळी स्वयंसहाय्यता महीला गटाचे विविध विभागीय व्यवस्थापक रवींद्र चुनारकर, देवानंद जुवारे, तथा आय. सि. आर. पी. रुपाली मोहुर्ले, साधनाताई भाष्कर बानबले, शिल्पा दर्शन खोब्रागडे, जयश्री संदीप बट्टे, शालुबाई राजेंद्र राऊत, धम्मदिना बंडु खोब्रागडे, नाजूक सुहास झाडे, मिनाक्षी रुषीदेव कांबळे व इतर पदाधिकारी व सदस्य महीला वर्ग यांनी अथक परिश्रम घेतला.








