Home चंद्रपूर बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची...

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी…

0
464

बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी…

 

चंद्रपूर (बल्लारपूर) :- जिल्ह्यातील महसूल विभाग अंतर्गत बोगस दीव्यांग प्रमाणपत्र सन १९९६ ते २०२१ या कालावधीत शासन सेवेत कार्यरत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी बधीर, आंधळेपणाचे तसेच अपंग असल्याचे इतर प्रमाणपत्राचा गैरवापर करून शासन सेवेत बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर केलेले आहे. असे बोगस प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करणाऱ्या जिल्ह्यातील महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची तात्काळ चौकशी करण्याची मागणी महिला व बाल सुरक्षा कल्याण फाऊंडेशन बल्लारपूर च्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष प्रिया झांबरे यांनी विधान अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.

बल्लारपूर तालुक्यात काही अपंग कर्मचारी आहेत त्यापैकी तुंगीडवार नामक कर्मचारी हा एकदम फिट आहे. चालणे, बोलणे, ऐकायला नीट येत असताना सदर कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र जोडून सेवा देत आहे. सदर कर्मचारी २०२५ मध्ये सेवानिवृत्त होत असून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल केली आहे. यामुळे त्यांना शासन स्तरावर देण्यात आलेले लाभ त्यांच्या थकीत वेतनातून कपात करण्यात येऊन सदर रक्कम शासन जमा करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सदर कर्मचाऱ्याने शासनाची दिशाभूल करून पदोन्नती मध्ये भ्रष्टाचार करून दिव्यांग अंतर्गत पदोन्नती मिळवलेली आहे. आणि काही कर्मचारी सदर कर्मचाऱ्या प्रमाणे दिव्यांग नसताना सुद्धा बोगस प्रमाणपत्र शासन दरबारी सादर करून दिशाभूल केली आहे. यामुळे या सर्व प्रकरणाची कसून चौकशी करून सदर कर्मचाऱ्यांनी घेतलेले वेतन, सेवा ज्येष्ठता लाभ, आगाऊ वेतन शासन जमा करण्यात येऊन पदोन्नती बढत रद्द करून मूळ पदावर स्थायी करण्यात यावे. बल्लारपूर तालुक्यासह जिल्ह्यातील जवळपास २० ते २५ महसूल विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बोगस प्रमाणपत्रांची चौकशी करून शासन स्तरावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदन कर्त्याने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!