घुग्घुस येथे दादाचा दांडिया उत्सव व गरबा नृत्य स्पर्धा थाटामाटात संपन्न…
घुग्घुस : येथील प्रयास सभागृहात रविवारी प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे दादाचा दांडिया उत्सव-२०२५ अंतर्गत दांडिया व गरबा नृत्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठया थाटामाटात झाला.
प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे सलग मागील अनेक वर्षापासून दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा घुग्घुसचे भूमिपुत्र देवराव भोंगळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, प्रमुख अतिथी भाजपाचे चिन्नाजी नलभोगा,जिल्हा सचिव (ग्रामीण) विनोद चौधरी,युवा नेते विवेक (गुड्डु) तिवारी, शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे, युवा नेते गणेश कुटेमाटे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष श्रीनिवास गोसकूला, प्रेमलाल पारधी, हसन शेख, आजम खान, रत्नेश सिंग, प्रमोद भोस्कर, सिनू इसारप, सुनील बाम, प्रदीप जोगी, सन्नी खारकर, बबलू सातपुते, अनिल नित, दिनेश बांगडे, तुलसीदास ढवस, शंकर सिद्दम, धनराज पारखी, सिनू रामटेके, नितीन काळे, इर्शाद कुरेशी, सतीश बोन्डे, श्रीकांत सावे, मिलिंद पानघाटे, मोमीन शेख, दिलीप कांबळे मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच घुग्घुसचे भूमिपुत्र देवराव भोंगळे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण ४१९ स्पर्धकांनी भाग घेतला होता. युवती गट व महिला गट रेफ्रिजरेटर, वाशिंग मशीन, एलईडी टीव्ही व आकर्षक ट्रॉफी तसेच लकी ड्रा मध्ये पैठणी साडी, मिक्सर, मोबाईल, गिफ्ट सेट, हॉटस्पॉट व टिफिन असे पारितोषिके ठेवण्यात आली होती.
विजेत्या स्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजिका अर्चना भोंगळे, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, माजी सभापती नितु चौधरी, वैशाली ढवस, कुसुम सातपुते, सारिका भोंगळे, सिमा पारखी, शिल्पा थेरे, निशा उरकुडे, पुष्पा रामटेके, विना घोरपडे, अमीना बेगम, नाजमा कुरेशी, विना बांगडे, रुंदा कोंगरे, वंदना मुळेवार यांनी प्रयत्न केले.








