Home चंद्रपूर पळसगाव येथे जनजागृती कार्यक्रम

पळसगाव येथे जनजागृती कार्यक्रम

0
313

पळसगाव येथे जनजागृती कार्यक्रम

राजुरा (प्रतिनिधी)- बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथे दारूबंदी महिला मंडळ पळसगाव व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात जनजागृतीचा कार्यक्रम दिनांक 24 सप्टेंबर बुधवारी पार पडला त्यामध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस स्टेशन कोठारी ठाणेदार योगेश खरसान यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच संगीताताई सोयाम होत्या. सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्य महादेव शेवकर यांनी केले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे पळसगाव येथे मागील अनेक दिवसापासून काही व्यक्ती अवैध दारू विक्री धंदा सुरू असल्याने त्याचा परिणाम अनेकांच्या कुटुंबावर झाले . कुटुंबातील पुरुषवर्ग दारूपीउन घरादारात तमाशे करीत असत त्याचा परिणाम कुटुंबात व शिक्षण घेत असलेल्या मुला मुलीवर होत होता. गावातील महिला एकत्र येऊन अवैध दारू विक्री बंद करण्याचे ठरविले . पोलीस पाटील मुन्नाबाई शेवकर व ग्रामपंचायत च्या मदतीने गावामध्ये अवैध दारू विक्री महिलांच्या माध्यमातून बंद झाले.
गाव व्यसनमुक्त व्हावा, अंधश्रद्धेचे निर्मूलन व्हावे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावर मार्गदर्शक संतोष कुंदोजवार यांना प्रचारण करण्यात आले .त्यांनी आपल्या कृतीमध्ये बुवाबाजी ,जादूटोणा, अंगात देवी येणे, ढोंगी बाबाचे चमत्कारिक कृत्य , संवाद साधून हसवून ,समजावून सांगितले. रजनीकांत चांदेकर व्यसनमुक्ती वर यांनी मार्गदर्शन केले.
ठाणेदार योगेश खरसान यांनी आपल्या मार्गदर्शनातुन पळसगाव येथील महिला जागृत झालेले आहेत त्यांनी केलेले दारूबंदीचे , व्यसनमुकतीचे , अंधश्रद्धा निर्मूलन कार्य कौतुकास्पद आहे .त्यांच्या या कार्याला पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी राहील आस्वासन दिले.
सदर कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित ठाणेदार खरसान, संतोष कुदोजवार, रजनिकांत चांदेकर यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.पोलीस पाटील मुन्नाबाई शेवकर, तंटामुक्ती अध्यक्ष व्यंकटेश बुद्धलवार, ग्रामसेवक मिलिंद देवगडे ,उपसरपंच नितीन वांढरे, ग्रामपंचायत सदस्य महादेव शेवकर, छोटू दुर्योधन ,माधुरी वांढरे ,लता माऊलीकर , चिडे सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कीर्ती प्रशांत झाडे, चंद्रकला वाघाडे, दारूबंदी महिला मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी संजय राऊत , वर्षा मांडरे इत्यादीने मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!