Home चंद्रपूर फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर

फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर

0
221

फ्रेशर्स व फेअरवेल सोहळा – अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर

 

अदानी स्किल डेव्हलपमेंट सेंटर येथे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी GDA बॅच लाँचिंग सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला मान्यवर मुख्य पाहुणे चीफ प्लांट मॅनेजर श्री. सत्यनारायण दिघामार्ती, CSR प्रमुख श्री. साई गौतम, प्रोजेक्ट ऑफिसर CSR श्री. रुपेश कुकडे तसेच कु. प्रगती पाल उपस्थित होते. मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून युवकांमध्ये कौशल्य विकास व रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्राकडून होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.सौरभ मून व स्वाती फरकाडे यांनी केले, तर नियोजन व आयोजन श्री.गणेश कांबळे व कु.प्रतिक्षा मोहितकर यांनी केले.
कार्यक्रमात किट वितरण सोहळा तसेच फ्रेशर्स व फेअरवेल निमित्त सांस्कृतिक सादरीकरणे पार पडली. विशेष क्षणी CSR टीमने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना ऑफर लेटर्स प्रदान केली, ज्यामुळे विद्यार्थी व केंद्र या दोघांसाठीही तो अभिमानाचा क्षण ठरला.
संपूर्ण कार्यक्रम उत्साह, प्रोत्साहन व प्रेरणाने परिपूर्ण होता. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात फ्रेशर्स रॅम्प वॉक विशेष आकर्षण ठरला. निकाल सेंटर हेड सौ. शुभांगी नगराळे यांनी जाहीर केला, ज्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स–2025 किताब पटकावला.
विद्यार्थी व कर्मचारी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा कार्यक्रम खरोखरच अविस्मरणीय ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!