Home चंद्रपूर माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या घटनेचा तीव्र...

माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या घटनेचा तीव्र निषेध…

0
441

माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्याबाबत सोशल मीडियावर झालेल्या बदनामीच्या घटनेचा तीव्र निषेध…

उद्या विरूर स्टेशन येथे निषेध मोर्चा

 

विरुर स्टे. / राजुरा :– शेतकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वामनराव चटप यांच्या विरोधात फेसबुकवर करण्यात आलेल्या बदनामीकारक पोस्ट प्रकरणी समाजमनात संताप आहे. या प्रकाराचा निषेध नोंदविण्यासाठी व कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. करण्यासाठी उद्या २१ सप्टेंबरला ११ वाजता विरूर स्टेशन बसस्थानक येथे निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सर्व कार्यकर्ते, शेतकरी, युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या राजुरा तालुक्यात मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. विकृत मानसिकतेतून समाज मनात फूट पाडण्याचे काम समाज माध्यमातून होताना दिसून येत असून यामागे मोठे जाळे असल्याचे बोलल्या जात आहे.

सदर पोस्ट प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून अशा बदनामीकारक पोस्ट करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संबंधाने आज विरूर स्टेशन पोलीस ठाणे ठाणेदार यांना निवेदन देण्यात आले.

निषेध मोर्चातील मागण्या
👉 अन्याय व अपमान सहन केला जाणार नाही!
👉 दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे!

शेतकरी संघटनायुवा आघाडी द्वारे याद्वारे उद्या मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विरूर येथील शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते गजानन ढवस (7972611286) यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!