Home चंद्रपूर घुग्घूस शहरातील दर आठवडी बाजार पार्किंगची व्यवस्था करा – मनसे

घुग्घूस शहरातील दर आठवडी बाजार पार्किंगची व्यवस्था करा – मनसे

0
161

घुग्घूस शहरातील दर आठवडी बाजार पार्किंगची व्यवस्था करा – मनसे

घुग्घूस येथील शहरातील आहे की, पन्नास हजार लोकसंख्येच्या वस्तीत सप्ताहातून एक दिवस रविवारला फार मोठ्या प्रमाणावर आठवडी बाजार भरण्यात येतो तसेच परिसरातील गावा-गावातील बाजारात १५-२० गावातील लोक भाजीपाला,फळ घेण्याकरिता येतात तसेच गावातील लोकसंख्या विचारात घेऊन आठवडी बाजारात फार मोठ्या प्रमाणावर वाहन पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे अनेक मोठ्या प्रमाणात वाहन पार्किंग समस्या निर्माण होत आहे, तसेच घुग्घूस नकोडा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे या ठिकाणाहून वाहतूक करण्यात अडचण निर्माण होतात व तसेच नगरपरिषद समोरील गुजरी बाजार या ठिकाणी सुद्धा गावातील भरपूर प्रमाणात लोक रोज बाजार घेण्याकरता येतात त्या ठिकाणी सुद्धा पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे तरी या विषयाची गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती व्यवस्था करण्यात यावी.

असे निवेदनातून मागणी दखल घेऊन पुढील कर्यावाई करण्यात यावी. याप्रसंगी शहराध्यक्ष घुग्घुस सुमित कोहळे, शहर उपाध्यक्ष निशांत ठाकरे,मनसैनिक निखिल बोबड़े, आदित्य गज्भ्ये, गीतेश डोंगे,मयूर तूरणकर,रोशन कड़पते प्रवीण पाटिल वैभव मशीरकर आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!