Home चंद्रपूर विवेक बोढे यांची वेकोलिच्या उपक्षेत्रीय प्रबंधकांशी विविध समस्या संदर्भात बैठक

विवेक बोढे यांची वेकोलिच्या उपक्षेत्रीय प्रबंधकांशी विविध समस्या संदर्भात बैठक

0
157

विवेक बोढे यांची वेकोलिच्या उपक्षेत्रीय प्रबंधकांशी विविध समस्या संदर्भात बैठक

घुग्घुस: शहरातील विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात घुग्घुस वेकोलि वणी क्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक मनीष पोडे यांच्यासोबत भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांची विविध समस्यांसंदर्भात घुग्घुस येथील वेकोलिच्या कार्यालयात बैठक पार पडली.

बैठकीदरम्यान घुग्घुस शहरातील बँक ऑफ इंडिया जवळील वेकोलिच्या लोखंडी पुलाचे काम तत्काळ पुर्ण करणे, घुग्घुस शहरातील वेकोलि वसाहतीच्या जीर्ण अवस्थेत असलेल्या क्वार्टरची तत्काळ दुरुस्ती करणे, घुग्घुस शहरातील तहसीलदार कार्यालया जवळील बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे आरो यंत्र लवकर सुरु करणे, घुग्घुस शहरातील वेकोलिच्या मोठया तलावाचे खोलीकरण करणे अश्या विविध समस्या सोडविण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी घुग्घुस वेकोलि वणी क्षेत्राचे उपक्षेत्रीय प्रबंधक मनीष पोडे यांनी सर्व समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी भाजपाचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, भाजयुमोचे गणेश कुटेमाटे, सिनू इसारप, प्रमोद भोस्कर, सतीश बोन्डे, मिलिंद पानघाटे, श्रीकांत सावे, सुरेंद्र जोगी, असगर खान, उमेश दडमल आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!