Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा

गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा

0
182

गडचिरोली जिल्ह्याच्या रस्ते विकासासाठी महत्त्वपूर्ण चर्चा

आमदार मिलिंद नरोटे व शिष्टमंडळाने केली केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत सविस्तर चर्चा

 

आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांच्यासोबत गडचिरोली जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या उभारणीबाबत तसेच रिंग रोडच्या कामाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार रस्ते हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कामांमुळे जिल्ह्यातील संपर्क व्यवस्था सुधारेल, वाहतूक सुलभ होईल तसेच सर्वसामान्य नागरिकांना थेट दिलासा मिळेल.

गडचिरोलीकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ही चर्चा निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त विद्यमान आमदार मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते अनंतजी साळवे भाजपा तालुकाध्यक्ष साजनजी गुंडावार, भाजपा जिल्हा सचिव सारंगजी साळवे, तालुका महामंत्री सुभाषजी धाईत, संजय कुंडू, बाळूभाऊ उंदीरवाडे व सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!